*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तुळजापूर येथे "मत वाचवा देश वाचवा "या अभियाना अंतर्गत तहसील कार्यालय समोर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणे साठी तुळजापूर तालुका भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मोर्चा आंदोलन आणि निदर्शने करून याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय लोकशाहीचे संरक्षण करणे, मतदारांच्या मतदानाच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व विश्वासार्ह राहावी, यासाठी ठोस पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेचा मतदानाचा अधिकार हा सर्वोच्च असून, या अधिकाराच्या संरक्षणाची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे.
सध्या देशात निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि मतदारांच्या अधिकारांबाबत जनतेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेणे
या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने 'मत वाचवा, देश वाचवा' अभियानांतर्गत तहसील कार्यालय, तुळजापूर येथे मोर्चा व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व निष्पक्षता सुनिश्वित करावी आणि मतदारांच्या अधिकारांबाबत उपस्थित होणान्या प्रश्नांची योग्य ती दखल घेण्यात यावी, अशीही आमची मागणी आहे
तरी आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन सदर मागण्या संबंधित वरिष्ठ प्राधिकरणापर्यत पोहोचवाव्यात. तसेच लोकशाही मार्गाने आयोजित करण्यात येणान्या मोर्चा व निदर्शने आंदोलनाची नोंद घ्यावी आणि आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य करावे, आवाहन यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आले
लोकशाही वाचवा ! मतदारांचे अधिकार वाचवा ! मत वाचवा, देश वाचवा !
अॅड. अरविंद बेडगे तालुका अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस कमिटी, तुळजापूर.
अॅड. धीरज आप्पासाहेब कदम-पाटील मा. अध्यक्ष, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी
श्री. अमोल कुतबळ कार्याध्यक्ष, तुळजापूर तथा गटनेते, तुळजापूर.
नगरपरिषद








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा