Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६

उजनी वरील आय टी डाटा सेंटरसह चार प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या भावना आमदार नारायण आबा पाटील यांनी जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्या समोर मांडल्या*

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीस करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की करमाळा मतदार संघातील सिंचनाचा प्रश्न आपण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर मांडला.                                  


. करमाळा मतदार संघातील दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती देऊन कुकडीच्या रब्बी आवर्तनाची मागणी केली. तसेच जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याची सोय तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय लक्षात घेऊन कुकडी आवर्तन चालू असताना दिवस वाढवून मांगी तलावातही कुकडीचे पाणी दिले जावे अशी आग्रही मागणी केली. हि बैठक कुकडी कालवा सल्लागार समितीची असतानाही करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील दुष्काळ निवारण करण्यासाठी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन विचाराधीन असावे याबाबत लेखी निवेदन दिले व प्रत्यक्ष मागणीही केली. तसेच उजनीच्या पाण्यावर होऊ पाहणाऱ्या तरंगता सौर उर्जा प्रकल्प तसेच ए आय डाटा सेंटर आणि इतर प्रकल्प याबाबत शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगून यामुळे उजनी धरणग्रस्त व मच्छीमार यांचेही दीर्घकाळ नुकसान होणार असल्याचे सांगितले व याबाबत एक लेखी निवेदन देऊन या प्रकल्पाचा उजनीशिवाय इतर ठिकाणी विचिर केला जावा आणि शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान वा हानीपासुन वाचवावे असे साकडेवजा विनंती केली. करमाळा मतदार संघातील उत्तर भागास वरदायिनी ठरणार असलेल्या नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे काम निधी आभावी अजून सुरु झाले नसल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा