*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या जेऊर रेल्वे स्थानकावर सोलापूर अजमेर सोलापूर या विशेष सुपरफास्ट रेल्वे गाडीला जेऊर येथे त्वरित थांबा मिळावा अशा मागणीचे निवेदन जेऊर येथील रेल्वे प्रवासी संघटनेने मा. श्री जयदीप प्रदर्शने वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मध्य रेल्वे सोलापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की . 08/10/2026 पासून दिवाळी सणानिमित्त चालू होणाऱ्या तसेच पुढेही नियमित चालू राहणाऱ्या साप्ताहिक “सोलापूर - अजमेर - सोलापूर (०९६२७-०९६२८) स्पेशल विशेष सुपरफास्ट” या गाडीला “जेऊर” स्थानकावर तत्काळ थांबा मंजूर करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदनात पुढे आणखीन असे म्हटले आहे की जेऊर स्थानक करमाळा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असून करमाळा व जामखेड तालुक्याला दळणवळणाच्या दृष्टिकोनातून खूप सोयीचे आहे. या तालुक्यात मुस्लिम समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या भागातील सर्वसामान्य नागरिक व मुस्लिम समाजाचे असंख्य बांधव अजमेर या प्रसिद्ध दर्गा देवस्थानाचे दर्शनासाठी जात येत असतात. तसेच जेऊर स्टेशन पासून ३० किलोमीटर अंतरावर आवाटी येथे प्रसिद्ध “अल्हाज वली चांदपाशा दर्गाह आहे”. देशभरातून तसेच अजमेर येथून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात, तसेच सुरत येथे प्रसिद्ध मोठे होलसेल कपडा मार्केट असल्याकारणाने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर या भागातील व्यापारी व नागरिक येत जात असतात. त्यामुळे अजमेर या प्रसिद्ध देवस्थान ठिकाणी येणे-जाणे साठी आपल्या सोलापूर विभागातून वरील एकमेव गाडी उपलब्ध आहे. त्यामुळे या गाडीला जेऊर स्थानकावर येताना व जाताना थांबा मंजूर करण्यात यावा व देवस्थानाला जाणे-येण्याची सोय करावी त्यामुळे असंख्य प्रवाशांसाठी हे सोयीस्कर होणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे
तरी आपण “सोलापूर - अजमेर - सोलापूर (०९६२७-०९६२८) विशेष सुपरफास्ट” या गाडीला “जेऊर” स्थानकावर थांबा मंजूर करण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रोसी संघटना जीव यांनी निधनाची शेवटी केली आहे
गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
जेऊर येथे सोलापूर अजमेर सोलापूर या स्पेशल विशेष सुपरफास्ट रेल्वे गाडीला जेऊर येथे थांबा मंजूर करावा जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी Head
जेऊर येथे सोलापूर अजमेर सोलापूर या स्पेशल विशेष सुपरफास्ट रेल्वे गाडीला जेऊर येथे थांबा मंजूर करावा जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी Head
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा