*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील देवळाली येथील बिल्डर रमेश पप्पू शिंदे यांचे चिरंजीव प्रथमेश शिंदे यांनी पुणे येथे झालेल्या विद्यापीठ अंतर्गत झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे
सहा ऑक्टोंबर रोजी पुणे येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत त्यांने सदरचे घवघवीत यश मिळवले आहे सदरच्या स्पर्धा ह्या पुणे विद्यापीठाने आयोजित केल्या होत्या या कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथमेश रमेश शिंदे यांनी गोल्ड मेडल. मिळविले आहे अत्यंत प्रतिकूल व गरीबी परिस्थितीवर मात करीत त्याने सदरचे यश स्वतःच्या जिद्दीवर मिळवले आहे
सध्या तो मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज येथे सराव करीत आहे या अगोदर देखील प्रथमेश याने कुस्ती स्पर्धेत वेगवेगळे पदक मिळवले आहे करमाळा येथील नामवंत एव्हरेस्ट टेलर व्यावसायिक बिल्डर रमेश पप्पू शिंदे यांचा तो चिरंजीव आहे त्याला वस्ताद महेश मोहोळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील देवळाली येथील प्रथमेश शिंदे याने कुस्ती क्षेत्रात प्रथमताच सुवर्णपदक मिळविल्याने त्याचे करमाळा शहर तालुक्यामधून कुस्तीगीर शौकिना मधून विशेष अभिनंदन होत आहे
बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
करमाळा तालुक्यातील देवळाली येथील नामवंत मल्ल प्रथमेश शिंदे कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला Head
करमाळा तालुक्यातील देवळाली येथील नामवंत मल्ल प्रथमेश शिंदे कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला Head
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा