Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२६

*मोह़ोळ येथे विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा -62000/- किमतीची सोन्याची हरवलेली बोरमाळ केली परत*

 *मोहोळ--- प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


श्रीमती अश्विनी अनिल कोळी राहणार बागवान नगर मोहोळ यांचे पाच ग्रॅम वजनाची बोरमाळ   पर्समध्ये ठेवलेली . मोहोळ पंढरपूर  रेडरोज कोल्ड्रिंक्स समोर  अनावधाराने पडली होती.  राज विकास शिरसाट  अभिषेक किरण बनसोडे रविराज गणेश गायकवाड राहणार दत्तनगर मोहोळ हे विद्यार्थी चहा पिण्यासाठी  चंद्रमौळी गणेश मंदिराकडे जात असताना  त्यांना बोरमाळ असलेला पॉकेट दिसला. सदर पॉकेट च्या मध्ये सोने असल्याचे पाहून त्यांनी सदरचे  मोहोळ पोलीस ठाणे येथे आणून दिले.                                                       


    मोहोळ पोलीस ठाणे कडून  महिलेला संपर्क साधला असता.  दिनांक 27 /11/2026 रोजी सायंकाळी 06/30 वाजता मोहोळ बस स्थानक ते चंद्रमोळी गणपती दरम्यान पॉकिटमध्ये असलेली गोरमाळ पडली असल्याबाबत सांगितले त्यांची खात्री करून  सदरची 62000/-रुपये किमतीची बोरमाळ  आहे त्या परिस्थितीत महिलेला परत दिली. श्री दीपक पाटील पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस ठाणे यांनी  विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले  व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा