Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२६

शिवसेनेच्या वतीने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळीनिमित्त शिधावाटप!

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि सोलापूरच्या खासदार रणरागिणी मा. श्रीमती ज्योतीताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त शिधावाटप उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात व बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना दिवाळीनिमित्त शिधावाटप केले.

शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा असून, वर्षभर ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कष्ट करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि सणासुदीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे.

असे विचार श्री. सुयश पुष्पा बाळासाहेब कर्चे शिवसेना जिल्हाप्रमुख, ओबीसी सोलापूर.

यांनी मांडले

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा हा छोटासा प्रयत्न असून, शिवसेना नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.

यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा