*सातारा ---प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे च्या सातारा शाखेतील सेवानिवृत्त संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारिणी यांनी माननीय जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री यांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर अर्धा तास चर्चा केली .त्यावेळेस त्यांनी पेंशनर्स शिक्षकांचे प्रश्न व टोकांच्या गरजा प्रतिपादन केल्या . आमच्या मागण्या कडे सरकार ये लक्ष नाही . हे दुःख त्यांच्यासमोर मांडले . सरकार चा आम्हाला ही विचार करावा लागेल पण वेळ आल्या वर . असा खोचक विचार सध्या चर्चेत आहे . सेवा निवृत्तशिक्षकांची पेन्शन ही कोषागार मार्फत व्हावी . अशी आग्रहाने विनंती केली .यापूर्वी पेन्शन ही कॅ फो मार्फत व्हायची ती कधीही वेळेवर होत नाही .त्यामुळे निवृत्तलोकांचे हाला आपेष्टा,आजारपणानेहोत आहेत .गोळ्या औषधांचेअसं तुलन यामुळे पेश नर्स लोकांच्या मृत्यूचा दर वाढलेला आहे .
अर्थात मृत्यू कोणी थांबवू शकत नाही . पण कोणते ही मानसिक समाधान आयुष्य वाढवते . असी भावना व्यक्त केली .याची प्रशासन व शासन कोणीही दखल घेत नाही . हे आंतरिक दुःख व्यक्त करून पेन्शन ही कोषागार मार्फत व्हावी . राज्यात ही योजना सुरू केलेली आहे . मात्र या योजनेतून शिक्षक व शिक्षिकेतर वगळले आहेत .वास्तवतः सरकारने असा सापत्निक भेदभाव का केला ? हा प्रश्न आहे .त्याचबरोबर केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीची वेतन वाढ 2023 पासून प्रत्यक्षात दिली गेली . परंतु त्यातून जुने लोक वंचित ठेवले गेले आहेत .तरी पूर्व लाक्षी प्रभावाने ही वेतन वाढ मिळावी . तसेच काल्पनिक वेतन वाढीबाबत सन 2006 नंतर सेवानिवृत्त शेवटची हक्काची वेतन वाढ देणे नियमाने आहे . परंतु ती दिली गेली नाही . तसा आदेश सरकारला माननीय हायकोर्टाने दिलेला आहे .परंतु त्याचाही विचार न करता सरकार हे वेतन वाढ देत नाही . तरी राज्य संघटनेने यावर तोडगा काढून पाठीमागची फरक बिल यथावकाश द्यावीत . परंतु किमान वेतन वाढ तरी चालू करावी . अशी विनंती मा .श्री गोरे यांना केलेली आहे . वरील मागण्या सरकारच्या तिजोरीवर कसल्याही प्रकारचा बोजा न टाकता पुऱ्या करता येण्यासारख्या आहेत . ही काम सरकारची असून माननीय मुख्यमंत्री माननीय शिक्षण मंत्री माननीय अर्थमंत्री व मा . ग्राम विकास मंत्री साहेब यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा .राज्य संघटनेची त्यासाठी बैठक आयोजित करावी . आणि दोघांच्या चर्चेमधून हा प्रश्न सोडव व्या चा विचार करावा . गोरे साहेब आपण आमचे आहात . म्हणून आम्ही तुमच्यापुढे हे गाऱ्हाणे मांडत आहोत . अशा प्रकारची भावनिक साद .सातारा शाखेच्या कार्यकारणी व माननीय अध्यक्ष श्री शिंदे यांनी घातलेली आहे . सदर विषयावर चर्चा होऊन मीटिंग घेण्याचा मी नक्की प्रयत्न करीन अशी मंत्री महोदयांनी मान्यता दिली आहे.
प्रसिद्धी प्रमुख -
म . पे . अ . पुणे
डॉ . श्री संजय गिते कडून




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा