इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
दि. १२ नोव्हेंबर २६
महात्मा फुलेनगर- बिजवडी ( ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी छगन भोंगळे यांची देखील बिनविरोध निवड गुरुवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
या कारखान्याची सन २०२६-२०३१ ची पंचवार्षिक निवडणूक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. कारखान्याची ही सलग दुसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर कारखान्याचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष पदासाठी छगन भोंगळे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केली.
यावेळी नूतन संचालक राजवर्धन पाटील, वसंत मोहोळकर, पराग जाधव, शांतीलाल शिंदे, रविंद्र सरडे, राकेश शुक्ला, निलेश देवकर, राजेद्रकुमार देवकर, संतोष काळे, श्रीकांत देवकर, विजय खर्चे, रणजित निकम, रोहित गायकवाड, बिभिषण नलवडे, अतुल शिंगाडे, हरिश्चंद्र पारेकर, अमोल जाधव, रत्नमाला पवार, सुमन व्यवहारे उपस्थित होते.
या बिनविरोध निवडीनंतर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष छगन भोगळे यांचा ओंकार शुगर चे संचालक ओमराजे बोत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील म्हणाले, कारखान्याचे कामकाज कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना व ओंकार शुगर अँड डिस्टीलरी यांच्या सहयोगातून चालविले जात आहे. शासनाच्या मान्यतेने हा सहयोगी करार करण्यात आला असून यास एक वर्षे पूर्ण झाले आहे तर आता दुसरे वर्ष सुरू आहे. चालू सन २०२६-२७ चा गळीत हंगाम शुक्रवारी सायंकाळपासून पूर्ण क्षमतेने सुरू होईल. कारखान्याने गत हंगामासाठी प्रति टन ३३५० रुपये दर जाहीर केला असून, यामधील उर्वरित रक्कम प्रति टन १५० रुपये प्रमाणे दोन दिवसात जमा होईल. शेतकरी, कर्मचारी केंद्रबिंदू मानून कारखान्याचे कामकाज केले जात असून कारखान्याचे कामकाज एकजुटीने पक्ष विरहित असे केले जाईल. तरी शेतकऱ्यांनी कर्मयोगी कारखान्यास आपला सर्व ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडल्या साठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे व पार्थ पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, माजी आमदार यशवंत माने, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, प्रवीण माने, हनुमंत कोकाटे, अविनाश घोलप, तेजसिंह पाटील, अशोक घोगरे, डी. एन. जगताप आदींसह सर्वपक्षीय नेते, शिवसेना ठाकरे गट, शेतकरी संघटना व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांचे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार्य लाभलेबद्दल श्री पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे बिनविरोध नूतन संचालक मंडळाचा सत्कार ओमराजे बोत्रे-पाटील, लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, ॲड कृष्णाजी यादव, जयकुमार कारंडे, गोविंद रणवरे, ॲड मनोहर चौधरी, पिंटू काळे, उत्तम जाधव, विक्रांत कोरटकर, मनोज मोरे, अशोक शिंदे, आबासाहेब शिंगाडे, सुरेश मेहेर, दादासाहेब घोगरे, किरण पाटील, महादेव शेंडगे, अंकुश पाडुळे, कार्यकारी संचालक विजय शिर्के, जनरल मॅनेजर रणजीत तावरे आदींनी केला. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले.
फोटो:-कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष छगन भोंगळे यांचा सत्कार करण्यात आला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा