Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२६

स्वामी समर्थांच्या कृपेने आणि ग्राहकांच्या विश्वासाने धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्स यशाची नवी उंची गाठेल – महेश इंगळे

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


श्री स्वामी समर्थ देवस्थान, अक्कलकोटचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते कुंभेज फाटा येथे धनलक्ष्मी स्टील या नूतन व्यावसायिक दालनाचे उद्घाटन संपन्न झाले 

कुंभेज फाटा, ता. करमाळा : ग्राहकांना स्टील आणि हार्डवेअर क्षेत्रातील विविध प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कुंभेज फाटा (ता. करमाळा) येथे सुरू करण्यात आलेल्या ‘धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्स आणि हार्डवेअर’ या नूतन व्यावसायिक दालनाचा शुभारंभ दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि श्री स्वामी समर्थ देवस्थान, अक्कलकोटचे चेअरमन श्री. महेश मालक इंगळे यांच्या हस्ते, तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश करे-पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून भोसले परिवाराच्या या नूतन दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना महेश मालक इंगळे म्हणाले, “स्वामी समर्थांच्या कृपेने, ग्राहकांचा विश्वास, दर्जेदार साहित्य आणि उत्तम सेवा यांच्या बळावर धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्स निश्चितच यशाची नवी उंची गाठेल.” त्यांनी भोसले परिवाराला नवीन व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. बाळासाहेब भोसले यांना श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले.


धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्सचे प्रोप्रायटर बाळासाहेब भोसले, प्रवीण बाळासाहेब भोसले आणि संजय बाळासाहेब भोसले यांच्या वतीने उद्घाटक महेश मालक इंगळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कुंभेज फाटा परिसरातील ग्राहकांना स्टील व हार्डवेअर साहित्याच्या खरेदीसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार असल्याने या नव्या व्यावसायिक दालनाचे उपस्थितांनी स्वागत केले.

या उद्घाटन सोहळ्यास यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश करे-पाटील, प्राचार्य मिलिंद फंड, प्राचार्य बाळासाहेब नरारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर सुर्वे, जेऊरचे माजी सरपंच राजूशेठ गादिया, प्रसिद्ध व्यावसायिक प्रसन्नशेठ बलदोटा, अजयकुमार देशमुख, कल्याणराव साळुंके सर, कुंभेज ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सुर्वे, चेअरमन युवराज भोसले, सामाजिक कार्यकर्ते अनिलशेठ कादगे, समाजकल्याण विभागाचे अधिकारी युवराज भोसले, सहाय्यक उपनिबंधक तात्यासाहेब भोसले, मेजर बिभीषण कन्हेरे, कानिफनाथ गुटाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, करमाळाचे संचालक महादेव कामटे, सुभाष इंगोले, प्रगतशील बागायतदार संभाजी भोसले, भारत पवार, बाबा सुरवसे, अंकुश केत, रमेश शिंदे सर, केतन भोसले, गणेश सुर्वे, अभिजित भोसले, अतुल भोसले, बाबासाहेब माळी, नानासाहेब भोसले, सतीश चौगुले, नानासाहेब तोरमल, यून्नूस पठाण यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी, नागरिक आणि भोसले परिवाराचे आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या नव्या व्यवसायामुळे कुंभेज फाटा परिसरातील व्यापारपेठेला नवी चालना मिळण्यास मदत होणार आहे. स्टील आणि हार्डवेअर क्षेत्रातील विविध साहित्याची उपलब्धता, दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह ग्राहकसेवा यांच्या माध्यमातून धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्स ग्राहकांचा विश्वास संपादन करेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा