*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तुळजापूर शहर व श्री तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी तुळजापूर नगर परिषदेतील काँग्रेस नगरसेवकानी केली आहे
तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून, श्री तुळजाभवानी म श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शहरात येत असतात. विशेषतः नवरात्र महोत्सव व यात्रा काळात भाविकांची प्रचंड गर्दी असते.
या गर्दीच्या काळात तसेच वर्षभरात भाविकांना अचानक हृदयविकाराचा झटका, श्वास घेण्यास त्रास, अपघात किंवा इतर गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते. अशा वेळी रुग्णाला तातडीने प्राथमिक उपचार व योग्य वैद्यकीय सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशी कार्डियाक अॅम्ब्युलन्स (Cardiac Ambulance) उपलब्ध करून देण्यात यावी. सदर अॅम्ब्युलन्समध्ये प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सिजन, डिफिब्रिलेटर, ईसीजी मॉनिटर व आवश्यक जीवनरक्षक उपकरणांची सुविधा असावी.
सदर अॅम्ब्युलन्सचा उपयोग मंदिरात येणारे भाविक, स्थानिक नागरिक तसेच आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत देण्यासाठी व्हावा.
तरी भाविकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून कार्डियाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
आपले विश्वासु
अमोल माधवराव कुतवळ नगरसेवक न.प. तुळजापुर
आनंद नानासाहेब जगताप नगरसेवक न.प. तुळजापुर
रणजित चंद्रकांत इंगळे नगरसेवक न.प. तुळजापुर
अक्षय धनंजय कदम नगरसेवक न.प. तुळजापुर
प्रगती गोपाळ लोंढे नगरसेविका न.प. तुळजापुर
हेमंत रामचंद्र कांबळे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा