*पंढरपूर -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
पंढरपूर,येथे कार्तिकी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त आज दि२१ नोव्हेंबर रोजी पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्यासह श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. पहाटे २.२० वाजता हा पूजाविधी पार पडला.
या शासकीय महापूजेत मानाचा वारकरी म्हणून उचेगाव (खुर्द) ता. हदगाव जि. नांदेड येथील मानाचे वारकरी शेतकरी सुधाकर दशरथ शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता शिंदे यांना शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला.
बळीराजासाठी विठुरायाला साकडे
राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे आणि बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी समाजातील सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा