*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज शहर आणि परिसरात अकलूज नगर परिषदचे 4 दिवसातून पिण्याचे पाणी येऊन गेल्यानंतर वापरायच्या पाण्याची अत्यंत चिंताजनक आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नागरिकांना वापराच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून अनेक भागांत वापरण्याच्या पाण्यासाठी अशीच भीषण परिस्थितीतही नगरपरिषदेच्या मालकीच्या परंतु दुर्लक्षामुळे बंद असलेल्या बोअरवेल तातडीने चालू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नागरिकांना पर्यायी पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हे अकलूज नगरपरिषदेचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, अत्यंत खेदाची बाब म्हणजे प्रभाग क्रमांक ५ सह अकलूज शहरांतर्गत नगरपरिषदेच्या मालकीच्या आणि सार्वजनिक वापराच्या अनेक बोअरवेल गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे व देखभालीअभावी बंद अवस्थेत पडल्या आहेत. जर या बंद पडलेल्या बोअरवेल तातडीने दुरुस्त करून पूर्ववत चालू केल्या, तर परिसरातील नागरिकांची वापरण्याच्या पाण्याची तातडीची गरज भागण्यास मोठी मदत होईल आणि निर्माण झालेला पाण्याचा ताण काही प्रमाणात कमी होईल.नागरिकांच्या प्रमुख मागण्या:तातडीने सर्वेक्षण दुरुस्ती: अकलूज शहरात नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या परंतु सध्या बंद किंवा नादुरुरुस्त असलेल्या सर्व बोअरवेलची तात्काळ पाहणी करून, तांत्रिक व यंत्रसामग्रीतील बिघाड युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात यावेत.वीज पुरवठा व पाईपलाईन जोडणी: ज्या बोअरवेल चालू स्थितीत आहेत परंतु वीज जोडणी, सबमर्सिबल पंप किंवा स्टार्टरच्या अभावी बंद आहेत, त्या तात्काळ कार्यान्वित करून पाण्याचा प्रश्न मार्गे लावावा.आपत्कालीन टँकर व्यवस्था: जोपर्यंत सर्व बोअरवेल पूर्णक्षमतेने चालू होत नाहीत, तोपर्यंत ज्या भागात तीव्र पाणीटंचाई आहे, तेथे काही भागात नगरपरिषदेमार्फत नियमित पाण्याचे टँकर किंवा आपत्कालीन पाणीपुरवठा करण्यात यावा
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या पाणीपुरवठ्याबाबत नगरपरिषदेने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा, जनहितार्थ आणि नागरिकांच्या न्याय हक्काबाबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा