Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

दिवाळीचा गोडवा ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांपर्यंत! गिरवी येथे संतोष क्षिरसागर व कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम; दहा वर्षांपासून फराळ वाटपाची परंपरा कायम

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


----- : दिवाळी आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला मिळावा, या उदात्त भावनेतून गिरवी येथील प्रगतशील शेतकरी संतोष क्षिरसागर व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून क्षिरसागर कुटुंबीयांनी हा सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू ठेवला असून, त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.



       ऊसतोड मजूर हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत. कुटुंबापासून दूर राहून, ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता हे मजूर शेतात आणि ऊसाच्या फडात कष्ट करतात. त्यांच्या श्रमातूनच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत पार पडतो. मात्र, सणासुदीच्या काळात अनेकदा या मजुरांना आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद घेता येत नाही. हीच सामाजिक जाणीव ठेवून संतोष क्षिरसागर व कुटुंबीयांनी ऊसतोड मजुरांच्या जीवनात दिवाळीचा गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.


दिवाळीच्या निमित्ताने मजुरांना फराळाचे साहित्य देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर कष्टकरी बांधवांप्रती आदर, माणुसकी आणि आपुलकीची भावना जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे या उपक्रमातून दिसून येते.

       आजच्या धावपळीच्या जीवनात सामाजिक बांधिलकी जपत गेली दहा वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. समाजातील इतर घटकांनीही अशा उपक्रमांतून गरजू आणि कष्टकरी बांधवांच्या सणातील आनंदात सहभागी व्हावे, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून मिळत आहे.

    या उपक्रमांतर्गत ऊसतोड मजुरांना प्रत्येकी पाच किलो प्रमाणे चिवडा, चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे आदी पारंपरिक दिवाळी फराळाचे साहित्य देण्यात आले. मजुरांनी फराळ स्वीकारत समाधान व्यक्त केले.

    संतोष क्षिरसागर म्हणाले, “ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद फुलवणे हेच आमचे ध्येय आहे. त्यांच्यामुळेच शेती आणि उद्योग चालतो,” असे त्यांनी सांगितले.

फोटो - गिरवी (ता. इंदापूर) येथील ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा