*पिलीव -- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
राजेवाडी ता.आटपाडी जि.सांगली येथील श्री .श्री.सद्गुरु साखर कारखाना हा सांगली जिल्ह्यात आहे. सांगली जिल्ह्यातील साखर सर्व कारखानदार शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात पहीली उचल 3900 रुपये देणार आहे. हंगाम संपल्यावर 100 रुपये व बाजारपेठेतील साखरेच्या दरानुसार 200 असा जवळपास 4200 रुपये दर देण्याचे सांगली, सातारा,कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर जाहीर केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक आंदोलनानंतर या तिन्ही जिल्ह्यातील साखर कारखानदाराकडुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर देण्याचे जाहीर करुनच गळीत हंगाम सुरु केला आहे .माञ सोलापूर जिल्ह्यातील एकाही साखर कारखानदाराने दर जाहीर केला नाही .दर न जाहीर करताच सर्वांनी साखर कारखानदारांनी रेटुन गळीत हंगाम नेटाने सुरु केला आहे .सध्या सर्वच कारखानदार दराबाबत ब्र शब्द काढण्यास तयारच नाहीत. माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सातारा ,पुणे जिल्ह्य़ात किंवा सदगुरु साखर कारखाना सोडुन इतर कारखाने चांगला दर देत आहेत. माञ राजेवाडी येथील सदगुरू साखर कारखाना सांगली जिल्ह्य़ात असुनही रिकव्हरी कमी आहे या नावाखाली हा कारखाना दर कमी देत आहे .गेल्या अनेक वर्षांपासून हा साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. या कारखान्याला 80 टक्के ऊस हा सोलापूर जिल्ह्यातुन गाळपास जात आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार त्यांच्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांबरोबर सोलापूर जिल्ह्यातील उस उत्पादकांना बरोबरीने दर देतात मग राजेवाडी येथील सदुगुरू साखर कारखाना का दर देत नाहीत असा सवाल सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधुन विचारला जात आहे. हा कारखाना अजुन किती दिवस आमची फसवणूक करणार आहे. असा संतप्त सवाल सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरीवर्गातुन राजेवाडी येथील श्री श्री सदगुरु साखर कारखाना प्रशासनाला विचारला जात आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार.राजु शेट्टी यांचयाकडे दराबाबत कैफियत मांडली असता .त्यांनी हा कारखाना सांगली जिल्हा कार्यक्षेत्रात असुन सर्व शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यातील साखर कारखानयाप्रमाणेच दर दिला पाहीजे. जर या साखर कारखान्याने सांगली जिल्ह्य़ाप्रमाणे दर न दिल्यास तिव्र आंदोलन झेडणार असुन अन्यथा या कारखान्यावर आंदोलन करणार असल्याचे खासदार राजु शेट्टी यांनी शेतकरयाबरोबर बोलताना सांगीतले. सध्या सांगली जिल्ह्यात असणारा राजेवाडी साखर कारखाना चालु गळीत हंगामात पहीली उचल किती देणार तसेच अंतीम दर किती देणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत हया कारखानयाने सोलापूर जिल्ह्यातील कारखानयाप्रमाणेच दर दिला आहे. गतवर्षी राजेवाडी 3000 रुपये पहीला हपता व दुसरा 100 रुपये म्हणजे 3100 रुपये दर देऊन बोळवण केली आहे. सदगुरू साखर कारखान्याचे माळशिरस व सोलापूर जिल्ह्यातील फाऊडर सभासद संख्या मोठी आहे. या शेअर्सवर कारखान्याने आजपर्यंत फक्त एकदाच लाभांश दिला आहे. यामुळे सभासद असुनही दरही कमी आणी शेअर्स भरूनही काहीच फायदाच नाही. आजही सोलापूर जिल्ह्यातुन तसेच माळशिरस तालुक्यातुन या कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपास जात आहे. पण कारखाना सांगली जिल्ह्यातील आणी रिकवहरीचया नावाखाली दर सोलापुरचा अशी विदारक परिसथिती या कारखानयाची आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी या कारखान्याच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. चौकट _ राजेवाडी येथील सद्गुरु साखर कारखाना सांगली जिल्ह्यात आहे. माञ तो सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रिकवहरीच्या नावाखाली ऊस दर कमी देत आहे. माञ सातारा, पुणे जिल्ह्य़ातील कारखाने त्यांच्या बरोबरीने सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर देतात फक्त सद्गुरु साखर कारखानाच फसवणूक करीत आहे. याबाबत मा. खासदार राजू शेट्टी यांच्याकडे शेतकऱ्यांनी कैफियत मांडली असुन या कारखान्याने सांगली जिल्ह्य़ातील कारखानयाप्रमाणेच दर द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खा.राजु शेट्टी यांनी दिला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी सांगीतले.
चौकट _ राजेवाडी येथील श्री श्री सदगुरु साखर कारखाना हा सांगली जिल्ह्यातील आहे. यामुळे दर सुद्धा सांगली जिल्ह्यातील कारखानयाप्रमाणेच दिला पाहीजे पण हा कारखाना अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दराबाबत फसवणूक करीत आहे. _ संजय पाटील, ऊस उत्पादक शेतकरी,कुसमोड.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा