इंदापूर,डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांवर होत असलेली अन्याय कारक वीज कपात तातडीने रद्द करून नियमित व सुरळीत ८ तास वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी कुगाव पंचक्रोशीतील शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. ना. दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेऊन उजनी काठच्या शेतकऱ्यांची कैफियत त्यांच्यासमोर मांडली.
उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक पद्धतीने वीज कपात केली जात असून त्यामुळे शेती पंपांना पुरेसा वीजपुरवठा होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उजनी बॅकवॉटर परिसरातील वीज कपात तातडीने रद्द करावी, शेतकऱ्यांना इतर भागांप्रमाणे समान न्याय द्यावा आणि शेतीसाठी नियमित व सुरळीत ८ तास वीजपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांकडे केली.
शिष्टमंडळाने मांडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या व वीज कपातीमुळे निर्माण झालेली परिस्थिती कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत वीज प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी श्री. धुळाभाऊ कोकरे, श्री. महादेव कामटे, श्री. कैलास बोंद्रे, श्री. अविनाश सरडे, श्री. इन्नुस सय्यद, श्री. शंकर बोंद्रे, श्री सचिन गावडे यांच्यासह इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते. उजनी बॅकवॉटर परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळून अन्यायकारक वीज कपात बंद व्हावी आणि शेतीसाठी सुरळीत ८ तास वीजपुरवठा सुरू व्हावा, अशी अपेक्षा उजनी बॅकवॉटर परिसरातील धरणग्रस्त शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा