Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२६

लोकनेते खासदार डॉ. निलेश लंके महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी

 *तुळजापूर --प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



डीसीसी बँकेच्या संचालकपदी विजय संपादन केल्यानंतर लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चा केली. यावेळी आई तुळजाभवानीला साडी-चोळी अर्पण करून मनोभावे आशीर्वाद घेतले.

याप्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर चे तहसीलदार माने मॅडम,  व श्री तुळजाभवानी देवी चे मुख्य पाळेकर पुजारी. प्रवीण नरहरी कदम यांच्या हस्ते लोकनेते डॉ. निलेशजी लंके साहेब यांचा शाल, श्रीफळ, मानाचा तुरा आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला.


तसेच तुळजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि काँग्रेसचे गटनेते अमोल कुतवळ शेतकरी स्वाभिमानी संघटना मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र गंपू इंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार केला.

यावेळी मित्रपरिवार व उपस्थित मान्यवरांनी साहेबांचे उत्साहात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सदैव लोकनेते साहेबांच्या पाठीशी राहो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा