*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
आमदार कैलास पाटील यांचे अपहरण करून आम्हाला मतदान करावे यासाठी दबाव टाकुन जीवे मारण्याचा व घातपात करण्याचा, संगनमताने कटकारस्तान करणे, जिवे मारण्याची धमकी देऊन त्याकरिता प्लॅन बनवणे अशा गंभिर स्वरुपाचे गुन्हे केल्याप्रकरणी छत्रपती संभाजी नगरचे आमदार संजय सिरसाट व त्यांच्या साथीदारांवर कायदेशीर कारवाई अशी मागणी तुळजापूर शहर तालुका महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या वतीने तुळजापूरची उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जुन 2022 मध्ये . आमदार संजय सिरसाट व त्यांच्या साथीदारांनी धाराशिव - कळंब विधानसभेचे आमदार . कैलास पाटील यांना आम्हाला मतदान करावे यासाठी त्यांचे अपहरण करुन दबाव तंत्र वापरुन संगनमताने कटकारस्तान करणे, जिवे मारण्याचा प्लॅन बनवणे अशा गंभिर स्वरुपाचे गुन्हे केल्याचे आमदार संजय सिरसट यांनी परवाच न्युज चॅनल वरती कबुल केले आहे.
संजय सिरसाट व त्यांच्या इतर साथीदारांकडुन आमदार कैलास पाटील यांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला आहे. तरी . कैलास पाटील यांचा जीवितास किंवा घतपात झाल्यास यास सर्वस्वी संजय सिरसाट व त्यांचे साथीदार यांना दोषी धरण्यात यावे व सदर प्रमाणी संजय सिरसाट व त्यांच्या साथीदारांवर भारतीय न्याय संहिता कलम 3(5) नुसार फौजदारी गुन्हे दाखल करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व वेळ प्रसंगी मे. न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे
. याप्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष धीरजभैया पाटील काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाचेमा. जिल्हाध्यक्ष. श्याम पवार तुळजापूर नगर परिषदेचे गटनेते अमोल कुतवळ . अमर भैया मगर. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक शेअरचे जिल्हाध्यक्ष तोफिकभाई शेख. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील .अर्जुनआप्पा साळुंखे. सागर इंगळे. नरेश पेंदे. किरण कालदास कदम .सागर कुमार इंगळे.खंडेराव जाधव. अमर चोपदार. नगरसेवक अक्षय धनंजय कदम. जाकीर शेख. विकास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते
प्रत:-
1. मा. पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस ठाणे तुळजापूर.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा