Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२६

करमाळ्यातील शेतकरी व नागरिकांच्या सहा मागण्यांसाठी बहुजन संघर्ष सेना आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाची पूर्वसूचना

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



करमाळ्यातील शेतकरी व नागरिकांच्या सहा मागण्यांसाठी बहुजन संघर्ष सेना आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाची पूर्वसूचना

ऊसदर, अतिवृष्टी अनुदान, दुष्काळ निधी, पेन्शन व उजनी धरणकाठावरील वीज प्रश्नावर शेकडो शेतकरी व विविध गावचे सरपंच यांच्या बैठकीत एक मताने रस्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले व आंदोलनाचा  इशारा देण्यात आला

करमाळा तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन संघर्ष सेना, करमाळा तालुका यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी, सोलापूर यांना लेखी निवेदन देऊन आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात आली आहे.

या निवेदनात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या

आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

१) कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे ऊसदर द्यावा : कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने ऊसदर मिळतो, त्याच धर्तीवर करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही योग्य व न्याय्य दर मिळावा. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आंबालिका,बारामती ऍग्रो,दौंड शुगर व तालुक्यातील सर्व साखर कारखानदारांना पत्र देऊन ऊसदर निश्चित करण्याबाबत सूचना कराव्यात. तसेच कारखानदार व शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करावी.

२) सन २०२५ मधील अतिवृष्टी अनुदान तातडीने द्यावे : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या करमाळा तालुक्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे प्रलंबित असलेले अतिवृष्टी अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे.

३) सन २०२६ मधील दुष्काळ निधीचे पाच हजार रुपये द्यावेत : दुष्काळ निधीअंतर्गत दिवाळीच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेले पाच हजार रुपये अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाहीत ते तातडीने मिळावेत

४) सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनाही दुष्काळ निधी द्यावा : अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर सामायिक क्षेत्राची नोंद असली तरी प्रत्यक्षात त्यांची स्वतंत्र वहिवाट व स्वतंत्र शेती आहे. केवळ सातबारा सामायिक असल्याच्या कारणावरून अशा शेतकऱ्यांना दुष्काळ निधीपासून वंचित ठेवू नये. 

५) निराधार व वृद्धापकाळ पेन्शनचे पैसे तातडीने जमा करावेत : इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना व इंदिरा गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर असूनही त्यांच्या खात्यावर नियमित पैसे जमा होत नाहीत. तसेच वेबसाईट बंद असल्याच्या कारणास्तव काही लाभार्थ्यांची नावे नोंदविण्यात आलेली नाहीत. संबंधित लाभार्थ्यांची नावे तातडीने नोंदवून त्यांना नियमित पेन्शन सुरू करावी.

६) उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दररोज आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा. तसेच भविष्यात वीज पुरवठ्यात कोणत्याही प्रकारची कपात करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

मागण्यांवर स्वतंत्र कार्यवाही करून लेखी उत्तर द्या!

या सर्व मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे आदेश द्यावेत. प्रत्येक मागणीवर स्वतंत्रपणे निर्णय घेऊन त्याबाबत लेखी उत्तर द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

 अशी भूमिका बहुजन संघर्ष सेनेने मांडली आहे.

प्रशासनाने मागण्यांची दखल घेऊन योग्य कार्यवाही न केल्यास दिनांक २०/११/२०२६ वार शुक्रवार रोजी रस्ता रोको आंदोलन बहुजन संघर्ष सेना, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन तहसील दार शिलपा ठोकडे म्याडम यांनी स्वीकारले

सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, यांना पाठवण्यात आल्या यावेळी उपस्थित स्वप्नील काळे पंचायत समिती सदस्य,धनंजय शिरसकर पंचायत समिती सदस्य, दादासाहेब लबडे, सागर पोरे सरपंच,दिलीप फरतडे सरपंच ,युवराज मगर सरपंच ,अरुण शेळके सरपंच ,विष्णू रंधवे सरपंच ,संदीप मारकड सरपंच,पांडुरंग साळुंखे सरपंच,संजय तोरमल सरपंच,  विनोद गरड, भीमराव घाडगे,भगवान डोंबाळे ,निलेश पडवळ ,राजेंद्र कांबळे ,दयानंद पोळके ,विनोद शिंदे ,हंबीरराव बोराडे ,सोमनाथ पोळ ,तुम गायकवाड ,अमोल साळुंखे ,मनोहर शिंदे ,पप्पू सरोदे ,शिवाजी शेळके ,राजेंद्र गायकवाड ,आत्माराम आरणे ,अमोल आरणे ,कल्याण कोठावळे ,लक्ष्मण आवटे ,हरिभाऊ चौधरी ,ज्ञानेश्वर लवंगरे ,मच्छिंद्र गायकवाड ,नामदेव कांबळे ,प्रवीण कांबळे ,झुकण गरुड ,नवनाथ एकाड,प्रदीप घाडगे ,प्रवीण भोसले ,नानासाहेब पोळ ,अतुल बरडे ,नामदेव कोठावळे ,लक्ष्मण शिंदे,आदि शेकडो शेतकरी नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा