Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२६

पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून कमलादेवी मंदिराच्या विकासासाठी दोन कोटी मंजूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती शिफारस

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा देवीचा माळ येथील कमला भवानी देवी मंदिरासमोरील भव्य गार्डन उभा करणे त्याचे सुशोभीकरण करणे, राजे राव रंभा निंबाळकर यांच्या समाधीची नूतनीकरण करणे, या कामासाठी दोन कोटी दहा लाख रुपये मंजूर झाले असून हे काम लवकर सुरू होणार असल्याची माहिती 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोड यांनी दिली आहे 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून या कामासाठी शंभूराजे देसाई यांच्याकडे मागणी करण्यात आली होती कमला भवानी देवीचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ चिवटे 

सचिव अनिल उर्फ आबा पाटील एडवोकेट शिरीष लोणकर 

राजनशेठ राठोड याचा पाठपुरावा केला होता पर्यटन खात्यामार्फत हा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडे वर्ग करण्यात आला असून कामाला आता विशेष गती मिळणार आहे श्री कमला भवानी देवी मंदिर करमाळ्यातील जागृत देवस्थान असून संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो फक्त या देवीच्या दर्शनासाठी करमाळा येथे येत असतात 

विधानसभेच्या प्रचारासाठी करमाळ्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री कमला भवानी मंदिराला मदत देण्याची घोषणा केली होती

महाराष्ट्र शासनाने कमलादेवी मंदिराच्या परिसर विकासासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत याचे सर्व भक्तातून स्वागत होत असून आमच्या मागणीला यश आली आहे याबद्दल समाधान असल्याचे मत ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी व्यक्त केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा