*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आदिनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; चेअरमन आमदार नारायण आबा पाटील यांच्याकडून करण्यात आली सहा लाख रुपयांची आर्थिक मदत!
कामावर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर; नारायण आबा पाटील यांच्या उदार भूमिकेचे सर्वत्र कौतुक
आदिनाथ कारखान्याचे चेअरमन आमदार नारायण आबा पाटील यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. त्यांच्या या सहकार्यामुळे कारखान्यातील 55 कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंदात आणि उत्साहात साजरी होणार आहे.
दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाला आनंदाने दिवाळी साजरी करता यावी, या भावनेतून आमदार चेअरमन नारायण आबा पाटील यांनी कर्मचाऱ्यांसाठी सहा लाख रुपयांची मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारखान्याची प्रगती ही केवळ व्यवस्थापनाच्या प्रयत्नांवर अवलंबून नसून त्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा मोलाचा वाटा असतो. कर्मचाऱ्यांच्या कष्टाची आणि योगदानाची जाणीव ठेवून त्यांच्या आनंदात सहभागी होणे ही नेतृत्वाची महत्त्वाची खूण आहे. नारायण आबा पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयातून कर्मचाऱ्यांप्रती असलेली आपुलकी आणि सहकार्याची भावना दिसून येते.
सहा लाख रुपयांची मदत देऊन त्यांनी केवळ आर्थिक सहकार्य केले नाही, तर कर्मचाऱ्यांच्या आनंदात सहभागी होत माणुसकीचे नातेही जपले आहे. त्यांच्या या निर्णयाचे कारखान्यातील कर्मचारी व संबंधितांकडून स्वागत आणि कौतुक होत आहे.
कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा सन्मान आणि त्यांच्या आनंदाला दिलेले प्राधान्य, यामुळे नारायण आबा पाटील यांनी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांसाठी गोड केली आहे. यासाठी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सर्जेराव राऊत व कार्यालयीन अधीक्षक मधुकर कदम यांनी विशेष प्रयत्न केले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा