Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२६

महात्मा बसवेश्वर यांच्या अवमानाचा महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेकडून तीव्र निषेध; लेखक व प्रकाशकांवर कायदेशीर कारवाईची मागणी

 *पुणे ‌--प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


**पुणे :*जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल करण्यात आलेली कथित अवमानकारक वक्तव्ये तसेच ‘बसव मंटप’ या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा, पुणे यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात पुणे शहर अध्यक्ष सोमेश्वर वाडी आणि महाराष्ट्र प्रदेश समितीचे सरचिटणीस बाळासाहेब होनराव यांच्या वतीने निषेधपत्र प्रसिद्ध करण्यात आले.


‘बसव मंटप’ या पुस्तकाचे लेखक रवी हंजी मठ आणि प्रकाशक विश्वेश्वर भट यांच्याविरोधात महासभेने निषेध नोंदवून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी संपूर्ण जगाला समता, बंधुता, मानवता, सामाजिक न्याय आणि श्रमप्रतिष्ठेचा महान संदेश दिला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी समाजाला नवी दिशा देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. अशा महामानवाबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणे तसेच त्यांच्या विचारांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचे महासभेने म्हटले आहे.

या प्रकारामुळे समस्त बसवप्रेमी आणि लिंगायत समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. संबंधित प्रकरणाची शासन व प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन लेखक आणि प्रकाशकांवर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

**अन्यथा मोठ्या संख्येने लिंगायत समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या वतीने देण्यात आला आहे.** यावेळी महासभेचे विविध पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा