*अक्कलकोट प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
श्री.वटवृक्ष मंदीरात स्वामी महाराज मंदीरात चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते एसटी बस ‘लालपरी’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
श्रीशैल गवंडी,) ‘गावगाथा’ दिवाळी अंक म्हणजे
ग्रामीण भागातील माणसांशी, गावाच्या संस्कृतीशी आणि मातीशी नाळ जोडणारा अंक असल्याचे प्रतीपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी केले. आज धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर एसटी बस-लालपरी या 'गावगाथा’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एसटी बस-लालपरी या 'गावगाथा’ दिवाळी अंकास संबोधीत करताना चेअरमन महेश मालक इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना चेअरमन महेश मालक इंगळे म्हणाले की गावगाथा दिवाळी अंकाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे.
संपादक धोंडप्पा नंदे हे अनेक अडचणींवर मात करून जिद्दीने दरवर्षी दिवाळी अंक प्रकाशित करतात. साहित्याची सेवा करत ग्रामीण भागातील साहित्यिक, लेखक आणि नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
सर्वसामान्यांच्या जीवनाशी जिव्हाळ्याचे नाते जोडणारी लालपरी म्हणजेच एसटी बस हा प्रत्येकाच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे. या विशेषांकामध्ये एसटी बस संदर्भातील विविध लेख, कथा, कविता, आठवणी तसेच एसटीच्या बदलत्या स्वरूपाचा वेध घेणारे साहित्य समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हा अंक केवळ दिवाळी अंक न राहता एसटीच्या प्रवासातील आठवणींना उजाळा देणारा एक अनमोल दस्तऐवज ठरणार आहे. अंकाचे मुखपृष्ठही अतिशय सुंदर आणि आकर्षक झाले आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांना संधी देत वेग वेगळे विषय हाताळण्याची धडपड धोंडप्पा नंदे सातत्याने करत आहेत. त्यांच्या या साहित्यिक वाटचालीला आणि गावगाथाच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करून सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, सचिन हन्नूरे, महेश मस्कले आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
- श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात 'गावगाथा' दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना चेअरमन महेश मालक इंगळे, संपादक धोंडप्पा नंदे आदी दिसत आहेत.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा