Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२६

तुळजापूर शहरातील वारंवार घडणाऱ्या आगीच्या दर्घटना टाळण्यासाठी तुळजा भवानी मंदिर संस्थान ने अग्रिशामक वाहन उपलब्ध करावे नगरसेवकांची मागणी


 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*


तुळजापूर शहरातील वारंवार घडणाऱ्या आगीच्या दर्घटना टाळण्यासाठी  तुळजा भवानी मंदिर संस्थान ने अग्रिशामक वाहन उपलब्ध करावे अशी मागणी तुळजापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी निवेदनाद्वारे केली आहे

तुळजापूर शहर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, येथे दररोज हजारो भाविकांची ये-जा असते. शहरात व्यापारी पेठा, निवासी वस्त्या तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अलीकडील काळात शहरात वारंवार आगीच्या दुर्घटना घडत असून, अशा घटनांमध्ये जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील दोन तीन दिवासपुर्वी दर्शन मंडपाकडे जाणा-या काळ भैरवकडावर लागलेल्या आगीमुळे भाविकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अशा वारंवार होत असलेल्या घटनामुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आग विझविण्यासाठी पुरेशी व सक्षम अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सामाजिक दायित्व व भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन विभागास आवश्यक क्षमतेचे आधुनिक अग्निशामक वाहन उपलब्ध करून देण्यात यावे.

तसेच सदर वाहनासाठी आवश्यक तांत्रिक उपकरणे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे

आपण या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी अशी ही विनंती करण्यात आली आहे

आपले विश्वासु

अमोल माधवराव कुतवळ नगरसेवक न. प. तुळजापुर

आनंद नानासाहेब जगताप नगरसेवक न.प. तुळजापुर

रणजित चंद्रकांत इंगळे नगरसेवक न.प. तुळजापुर

अक्षय धनंजय कदम नगरसेवक न. प. तुळजापुर

प्रगती गोपाळ लोंढे नगरसेविका न.प. तुळजापुर

हेमंत रामचंद्र कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा