Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२६

करमाळा येथे स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद Head

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



  स्वातंत्र्यसेनानी शूरवीर योद्धे व मैसूरचे महान शासक शहीद हजरत टिपू सुलतान आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त शहीद हजरत टिपू सुलतान बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्यावतीने दिनांक 27 नोव्हेंबर 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले श्रेष्ठदान रक्तदान आणि अमूल्य दान रक्तदान रक्ताला कोणतीही जात नसते सदरच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत 61 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले  




हजरत टिपू सुलतान हे भारतीय इतिहासातील एक शूर पराक्रमी व स्वाभिमानी युद्धा म्हणून ओळखले जातात त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्ताराला विरोध केला युद्धामध्ये आधुनिक शस्त्राचा वापर म्हणून रॉकेटचा वापर केला आणि आपल्या मात्रूभूमीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी इंग्रजा विरुद्ध अनेक लढाया लढल्या शत्रूसमोर कधी हार न मानता अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला त्यांचे शौर्य धैर्य स्वाभिमान आणि देशप्रेम आज ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे हे आपल्या आदम्य शौर्य पराक्रम आणि स्वाभिमानासाठी इतिहासात अजरामर आहेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी व त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सदर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे

सदर कार्यक्रमास करमाळा शहर व तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष अल्ताफ शेठ तांबोळी नगरसेवक महादेव आन्ना फंड नगरसेवक अमोल परदेशी माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद मुस्लिम युवा नेता अमीर शेठ तांबोळी शहीद हजरत टिपू सुलतान बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अमजद शेख अध्यक्ष सुफ्राण शेख सचिव अफजल शेख शाहरुख नालबंद शाहरुख पठाण असलम मदारी इम्तियाज वस्ताद आदी कार्यकर्ते उपस्थित होते

हजरत शहीद टिपू सुलतान सामाजिक बहुउद्देशीय संस्था ही एक सामाजिक संस्था असून आजपर्यंत सदरच्या संस्थेने विविध नावलौकिक उपक्रम राबविले असून टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेऊन सदर संस्थेने एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा