Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२६

*तुमचे १० आमदार होते तरीही आम्ही पवार यांना राज्यसभे वेळी ठामपणे पाठीशी उभे होतो,--काँग्रेसचं 'इमोशनल कार्ड', --NCP ने कोलांटउडी मारत मतदार संघ पुनर्रचना विधायकास पाठिंबा द्यायचे संकेत दिल्याने संताप, पवार निर्णय बदलणार?*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*



मुंबई : देशाचा राजकीय नकाशा बदलू पाहणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून विरोधकांमध्ये मतमतांतरे असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधेयकाला पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

इंडिया आघाडीत असतानाही सत्ताधाऱ्यांना पूरक भूमिका सिलसिला यानिमित्ताने राष्ट्रवादीने सुरूच ठेवला आहे. या साऱ्या प्रकारावर काँग्रेसने संताप व्यक्त करीत शरद पवार यांच्या राज्यसभा निवडणुकीची खास आठवण करून देत राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेवर विचार करावा, असे अप्रत्यक्षपणे सुचवले आहे.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीने शनिवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एरवी सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित असतात, मात्र आज पुनर्रचना विधेयकासारच्या इतक्या महत्त्वाच्या विषयावर विरोधकांची रणनीती ठरत असताना त्या गैरहजर राहणार आहेत. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एकही खासदार बैठकीला हजर राहणार नाही, अशी माहिती कळते आहे. या सगळ्यावरच काँग्रेसने संताप व्यक्त करीत काँग्रेसच्या मतांवर शरद पवार खासदार झालेत, अशी आठवण करून दिली आहे.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना 'आठवण' करून देणारी काँग्रेसची पोस्ट

शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली. आणि आता काय? परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत, असे काँग्रेसने पोस्टमध्ये म्हटले आहे.

'पाठिंब्यामागे भीती की पैसा?' राहुल गांधींचे सोशल मीडिया प्रमुख श्रीवत्स यांची पवारांवर टीका

परिसीमन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. राहुल गांधी यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया हँडलचे प्रमुख श्रीवत्स यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपने शरद पवारांचा पक्ष फोडला, पक्षाचं निवडणूक चिन्ह काढून घेतलं, त्यांना राजकीयदृष्ट्या बाजूला केलं आणि त्यांच्या कुटुंबाचा अपमान केला. असे असताना काँग्रेस आणि राहुल गांधी पवारांच्या पाठीशी उभे राहिले. परंतु ज्यांनी हे घडवून आणले त्या भाजपला पाठिंबा द्यायला पवार निघाले आहेत, अशी टीका श्रीवत्स यांनी केली आहे.

पवार सुळेंना भाजपसोबत जाण्यास भाग पाडणारं कारण भीती किंवा पैसा यापैकी एकच असू शकतं, असा गंभीर आरोप करीत भाजपला पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडून एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुनर्रचना विधेयकावरून विरोधकांमधील मतभेद आता उघडपणे समोर येताना दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा