Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२६

*राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत पात्र लाभार्थी वंचित राहत असल्याने मा. आमदार ज्ञानराज चौगुले यांची उमरगा तहसीलदाराशी चर्चा*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*


तहसील कार्यालय उमरगा..तहसील कार्यालयातील पुरवठा विभागा संबंधी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसून, रोजगाराअभावी त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा  प्रश्न निर्माण झाला आहे.             .         


 अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा संकटाच्या काळात सर्वसामान्य, गरजू व पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा आधार मिळणे अत्यंत आवश्यक असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत एकही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये, तसेच धान्य वितरणातील अडचणी दूर करून वितरण प्रक्रिया तातडीने विशेष मोहिमेच्या माध्यमातून राबविणे संदर्भात तहसीलदार श्री.गोविंद येरमे यांच्याशी चर्चा केली.


यावेळी नगराध्यक्ष किरण गायकवाड, बळीराम सुरवसे, गटनेते पंढरीनाथ कोणे, पंचायत समिती सदस्य तुकाराम जाधव, नगरसेवक शफी चौधरी, सचिन जाधव, राहुल शिंदे, बशीर शेख, आरती शिंदे, स्वाती स्वामी, अश्विनी सोनकांबळे, यलाम्मा विभुते, सुप्रिया घोडके, माजी नगरसेवक संतोष सगर, व्यंकट पाटील, शेखर पाटील, सरपंच हणमंत गुरव, शेखर घंटे, माधव जाधव, शिवाजी जमादार, नाना मदनसुरे, खय्युम चाकूरे, शरद इंगळे, राजू कारभारी, पप्पू समन, जागृत शिंदे, दत्ता डोंगरे, हरी भोसले यांच्यासह उमरगा तालुका शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा