इक्बाल ---मुल्ला (पञकार)
मो.8983 587 160
महाराष्ट्रातील सरकारी नोकरदार व खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आई -वडिलांना पगाराच्या "10% रक्कम" मिळण्याचा कायदा व्हावा !
जन्म दिलेल्या आई -वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या तरुणांचे "चिंताजनक" प्रमाण लक्षात घेऊन ,सांगलीतील विश्वासार्हता प्रामाणिकपणा आणि "चोख कारभार" या त्रिवेणी कर्तृत्वामुळे 2000 कोटी व्यवसाय करणारी पतसंस्था असा "नावलौकिक" प्राप्त करणाऱ्या कर्मवीर पतसंस्थेने "क्रांतिकारी" निर्णय घेतला.
कर्मवीर पतसंस्थेचे दूरदृष्टी लाभलेले धडाकेबाज- कर्तृत्वसंपन्न चेअरमन " .रावसाहेब पाटील "यांनी हा "निर्णय" संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला .
महाराष्ट्रात असा निर्णय घेणारी पहिली पतसंस्था असा मान त्यांनी पटकावला आहे .
प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आई -वडिलांना त्यांच्या पगारातील 10% रक्कम आता त्यांच्या "बँक खात्यात" जमा होणार आहे .. आपल्या आई वडिलांचा प्रत्येक मुलगा सांभाळ करतोच मग वृद्धाश्रमात येणारे हे आई -वडील कोण ??
शुगर -ब्लडप्रेशर आणि असंख्य आजारांनी वृद्ध आई -वडील ग्रासलेले असतात . मुलाने सांभाळ केला तर उत्तमच पण आई वडिलांची सेवा न करणाऱ्या अशा मुलांच्या वृद्ध आई -वडिलांसाठी मुलाच्या पगारातील महिना सर्वसाधारण 2000-3000 ही रक्कम म्हणजे मोठा आधार असणार आहे . मुलगा आई -वडीलांची काळजी करत असला तरी आई -वडिलांना महिन्याला Extra , त्यांच्या "खर्चासाठी" पैसे मिळाले तर त्यात वावगे काय ???
क्रांतिकारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रात गोरगरिबांसाठी ,पीडितांसाठी जो वसा व जे "बीज" जनमानसात रोवले आहे ,त्याच्या मार्गदर्शनानुसार कर्मवीर पतसंस्थेची सुखद वाटचाल सुरु आहे .
मी काही दिवसापूर्वी नोकरी करणाऱ्या मुलीने लग्न झाल्यावर आई -वडिलांना पगाराच्या "50% रक्कम" त्यांच्या खर्चासाठी द्यावी हा लेख लिहिला होता .त्या "पाश्वभूमीवर" आज कर्मवीर पतसंस्थेची ही घोषणा म्हणजे माझ्या लेखावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच म्हणावे लागेल .
असो ,कर्मवीर पतसंस्थेचे सर्व सन्माननीय संचालक , मुख्य कार्यकारी अधिकारी .अनिल मगदूम आणि कर्मवीर चे चेअरमन रावसाहेब पाटील तसेच व्हा .चेअरमन अशोक सकळे यांच्या कुशल - कणखर नेतृत्वामुळे महाराष्ट्रात एकप्रकारे परिवर्तन घडतं आहे . सरकारी खात्यात व खाजगी संस्थेत नोकरी करणाऱ्या सर्वांसाठीच एक दिशादर्शक घोषणा त्यांनी केली आहे . त्याचे सुखद पडसाद आगामी काळात सर्वांना निश्चित पाहावयास मिळतील याची खात्री आहे .
इकबाल मुल्ला ( पत्रकार ) संपादक - सांगली वेध ,
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा