टाइम्स 45 न्युज मराठी नेटवर्क
पत्रकारिता क्षेत्रात दैदिप्यमान ठसा उमटवणाऱ्या" दैनिक नवराष्ट्र" च्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यावर्षीचा महिला वुमन्स अवॉर्ड 2023 पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार क्षेत्रात आणि आता राजकीय क्षेत्रात 20% आणि सामाजिक क्षेत्रात 80 टक्के कार्य करणाऱ्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या असंघटित कामगार आघाडीच्या अध्यक्षा -ज्योतीताई कुंभार यांना दैनिक नवराष्ट्रचा "वुमन ॲचिव्हर्स ॲवार्ड 2023 " नवराष्ट्र पुरस्कार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी गणेश आॕडोटेरियम न्यू इंग्लिश स्कूल प्रिमायसेस टिळकरोड सदाशिव पेठ पुणे ४११०३० येथे दुपारी 3 वाजता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते व आमदार अश्विनी जगताप यांच्या उपस्थितीत देण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्यानंतर ज्योतीताई कुंभार म्हणाल्या की मला- दैनिक नवराष्ट्र- कडून जो पुरस्कार प्राप्त झाला याचा मला अभिमान आहे आज मी या पुरस्कारापर्यंत पोहोचले ते कै. प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनसेवेतून काम केले त्या कामाची पोचपावती मला प्राप्त झाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा