संपादक हुसेन मुलानी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो--9730 867 448
धर्मपुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 अंतर्गत कृषी सल्ला केंद्राने शेतीसाठी रोग निदानसाठी बोर्डो मिश्रण वापर करण्याचा सल्ला दिला.
बोर्डो मिश्रण हे कॉपर सल्फेट आणि चुना यांचे मिश्रण असून ते बुरशीनाशक म्हणून वापरले जाते. डाळिंबबागा, फळ शेती आणि चागांमध्ये डाउनी बुरशी पावडर बुरशी आणि इतर चुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी याचा वापर करावा असे कृषिदूत शेखर पठाडे, अनुप परदेशी, अनिकेत सरवदे, रोहन पाटील, ओंकार पाटेकर, प्रशिक नगराळे, विशाल पराडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रात्यक्षिकाच्या आयोजनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी.नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एम.एम. चंदनकर आणि प्रा. एच.व्ही. कल्याणी आणि प्रा.डॉ.डी.एस. ठावरे (प्लांट पॅथॉलॉजी विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा