Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने दिलेल्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट शेतकऱ्यांना 25% आग्रीम रक्कम द्यावी, खासदार --ओमप्रकाश निंबाळकर

 


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                        धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने दिलेल्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये झालेल्या घटीची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश धाराशिव चे खासदार ओम प्रकाश दादा निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले

याबाबत सविस्तर वृत्त असे की धाराशिव जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाची सुरुवात जून महिन्याच्या अखेरीस झाली परंतु अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही जिल्ह्यात जून महिन्यात फक्त पाच दिवस पाऊस पडला तर जुलै महिन्यात पंधरा दिवस व 18 ऑगस्टपर्यंत दोन दिवस असा जिल्ह्यात आतापर्यंत 22 दिवस पाऊस पडला असून एकूण सरासरी 17.4% पाऊस पडलेला आहे पावसाची सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील 7 लाख 57 हजार शेतकऱ्यांनी पाच लक्ष 99 411.26 एवढ्या हेक्टर क्षेत्रातील पिके संरक्षित केले आहेत जिल्ह्यातील मुख्य पीक सोयाबीन असून 5 लक्ष 60 ,468 शेतकऱ्यांनी 5 लक्ष 23,406.5 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत संरक्षित केले आहे धाराशिव जिल्ह्यात पेरणीनंतर समाधानकारक पावसाची अपेक्षा असताना जवळपास एक महिना पावसामध्ये खंड पडून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील 7 मंडळात 20 पेक्षा जास्त दिवस पाऊस झालेला नाही तर इतर मंडळात 17 ते 18 दिवस पाऊस झालेला नाही साधारणतः 21 दिवस पूर्ण होतील तरी त्यामुळे पिक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट निर्माण करणारे आहे त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीचे आयोजन करून पिक विमा कंपनी ला नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना 25% मर्यादा पर्यंत अग्रीम रक्कम देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करावी अशी सूचना खासदार ओमप्रकाश दादा निंबाळकर यांनी दिली आहे 

तसेच पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार सलग 21 दिवस पावसाचा खंड असल्यास शेतकऱ्यांना 25% भरपाई कंपनीला द्यावी लागते जिल्हाधिकाऱ्याने काल झालेल्या जिल्ह्यात स्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठका 11 महसूल मंडळातील पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते त्यामध्ये आणखी पंधरा मंडळाचा समावेश झालेला आहे दोन्ही मिळून 26 मंडळातील पिकांचे आजपासून रॅडम पद्धतीने पंचनामे होणार असून समितीतील सदस्यांनी पंचनामे करताना कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि पीक विम्याची ही अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष जमा होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील असेही खासदार ओम प्रकाश दादा निंबाळकर यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा