अकलूज------ प्रतिनिधी
लक्ष्मीकांत --कुरुडकर
टाइम्स 45 न्युज मराठी
मो. 7020 665 407
सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग, अकलूज प्रशालेत आज नागपंचमी सण साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.शेख मॅडम,प्रशालेतील सर्व शिक्षिका तसेच पालक वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती. प्रथमतः वारुळाच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले.
तद्नंतर प्रशालेतील शिक्षिका श्रीमती.पाटोळे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून नागपंचमी सणाचे महत्त्व व माहिती सांगितली.त्यानंतर किड्स रॉकस्टार शाळेतर्फे घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत आपल्या प्रशालेतील २ विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला त्याबद्दल त्यांचा सन्मान प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.शेख मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी २ विद्यार्थ्यांनी आपला नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर उपस्थित महिला पालक वर्ग,प्रशालेच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षिकांनी गोल फेर धरून विविध नागपंचमीची गाणी,पारंपरिक खेळ झिम्मा,फुगडी खेळून कार्यक्रमाचा आनंद लुटला.
याप्रसंगी विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाळकर मॅडम यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा