इकबाल -----मुल्ला पत्रकार----सांगली
मो.--8983 587 160
विधवा किंवा ज्यांचा पती मृत झाला असेल त्या स्त्रीला मन नाही का .? त्यांना भावना का ?? पती वारलेला असतो ,मुले मोठी झालेली असतात . अशा वेळी दुसरा विवाह केल्यास समाज काय म्हणेल ही भीती असते . वास्तविक आयुष्य मोठे असते ,सुख कमी व दुःखच जास्त असते .त्यामुळे इतरांवर भार न बनता या महिलांनीही स्वतःच्या विवाहासाठी स्पष्ट व ठाम" भूमिका घ्यावी .
तलाकशुदा किंवा विधवा महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपला पुरोगामी समाज "विचार" करणार आहे की नाही ??? या महिलांनाही ही पुनर्विवाह व्हावा असे वाटते , नवरा - मुले आणि स्वतःचे विश्व् असावे असे वाटते .परंतु समाजाच्या लाजेखातर ती महिला निशब्द असते . आजची ती तरुणी भविष्यात उतारवयात म्हातारी होईल ,तेंव्हा तिला साथ द्यायला कोणी हवे की नको .??
प्रेम - सुख समाधान या मनुष्यजातीला चुकलेल्या नाहीत. ज्यांचा नवरा वारला आहे ,त्या महिलेला पुरुषांचे आलेले अनुभव विचारा ..?
नजरेने बलात्कार करणाऱ्या , घृणास्पद नीतिमत्ता असणाऱ्या , महिलेच्या "संकटकाळात" परिस्थितीत स्वार्थ साधणाऱ्या त्या पुरुषांच्या प्रवृत्तीला आळा कसा बसणार ??? ती महिला रोज नवं -नवे "अनुभव" अंगीकृत करत "जीवन" जगत असते. पोटाची आग स्वस्थ बसू देत नसते .त्यामुळे उदरनिर्वाहासाठी अन्य मार्ग चोखाळणाऱ्या महिलाही आढळतात. त्यात पाय "घसरला" तर तथाकथित बचतगटांच्या माध्यमातून सुख मिळवण्याचा "मार्ग" ही उपलब्ध होतो .परंतु "अब्रू" ची लख्तरे वेशीवर टांगून परतीचा , दोर कापून टाकणारी ती स्पर्धा असते .
मुस्लिम धर्मात ..इस्लाम मध्ये पुरुषाला 4 विवाह करण्याची "मुभा" आहे .वास्तविक ज्याची आर्थिक स्थिती उत्तम असेल त्या व्यक्तीशी गरजू तलाकशुदा महिलेचा विवाह संपन्न होत असेल तर ,त्या महिलेला प्रतिष्ठा मिळते ,पतीचे सुख मिळते आणि आश्वासक संरक्षणकवच देखील मिळते . श्रीमंत मुस्लिमांनी 4 लग्न करावीत का ?? जर असे झाले तर "विधवा किंवा विधुर" महिलांचा प्रश्न मार्गी लागेल. आणि पुण्य देखील मिळेल .
विधवा व तलाकशुदा महिलेच्या पुनर्विवाहासाठी पुरोगामी समाज ठोस व आश्वासक पाऊल उचलेल याचा "आशावाद" आहे .
इकबाल मुल्ला ( पत्रकार )
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा