अकलुज -----प्रतिनिधी
केदार---लोहकरे
मो.-9890 095 283
अकलूज येथे श्री अकलाई देवी मंदिरात आजपासून सामुदायिक पारायण सोहळ्यास सुरुवात झाली असून त्यामध्ये महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला आहे.
श्रावण महिना व दुर्गाष्टमी निमित्त अकलूज येथील श्री अकलाई देवी देवस्थान यांचे वतीने आजपासून तीन दिवसीय देवी महात्म्य सामुदायिक पारायण सोहळ्यास सुरुवात झाली असून,या भव्य दिव्य भक्तिमय सोहळ्यासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे.
देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील यांनी सोहळ्याविषयी माहिती देताना सांगितले की,श्रावण मास व दुर्गाष्टमी निमित्त सदर सोहळ्याचे आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये ग्रंथ दिंडी, कलश फेरी,उत्सव मूर्तीची मिरवणूक नंतर तीन दिवसाचे सामुदायिक पारायण सोहळा होणार आहे.
भव्य दिव्य भक्तिमय सोहळ्यास मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून दिनांक 24 रोजी सोहळ्याची सांगता होणार आहे.सोहळ्याच्या पहिल्या दिवशी आज सकाळी सात वाजता कलश फेरी,ग्रंथ दिंडीचे आयोजन करून उत्सव मूर्तीची मिरवणूक अकलूज नगरीतून काढण्यात आली.या मिरवणूकीची सुरवात श्री अकलाई देवी मंदिर येथून सुरू झालेला हा सोहळा रामायण चौक,जुने ग्रामपंचायत,दत्त चौक,नगरपरिषद,गणपती मंदिर,काझी गल्ली,शनी मंदिर मार्गे पुन्हा अकलाई देवी मंदिर येथे सकाळी साडेआठ वाजता पोहोचली.त्यानंतर सकाळी नऊ वाजता सामुदायिक पारायण सुरुवात झाली.या पारायण सोहळ्यास महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत एकूण 311 महिलांनी पहिल्या दिवशी आपला सहभाग नोंदवल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी श्री अकलाई देवी देवस्थानचे कार्यकारी विश्वस्थ जयसिंह मोहिते पाटील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिपकराव खराडे,तात्या आसबे,तुकाराम टिंगरे,बाळासो सणस,राजू चव्हाण,संतोष लोहार,नंदकुमार गुरव,मोहन गुरव,मदन गुरव,अभिषेक गुरव यांच्यासह हनुमंत तालीम संघ हलगी वादक यांनी या भक्तीमय सोहळ्यास आपले योगदान दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा