इंदापूर तालुका -प्रतिनिधी
एस बी तांबोळी.
मो.-8378 081 147
: नागपंचमीनिमित्त नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) परिसरातील गावांत मंगळागौर उत्साहात साजरी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक गाणी, फुगड्या व झोक्याच्या खेळाचा आनंद लुटला. तर तरूणांनी पतंग व वावडी उडवण्याचा आनंद लुटला.
पिंपरी बुद्रुक येथील मानकरी पोलीस पाटील वर्धमान आजिनाथ बोडके, अँड. भाग्यवंत बोडके यांच्याकडे मंगळागौर उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक पूजेनंतर महादेव सूर्यवंशी यांच्या डोक्यावरून मंगळागौरीची प्रतिकृती देवी व फटाके वाजवत गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भीमा नदी तीरावर जाऊन आरती करून नदीपात्रात विसर्जन करण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी गाणी म्हणत मंगळागौरीला निरोप दिला. यावेळेस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशवाडी येथील मानकरी ज्ञानदेव दशरथ घोगरे व कल्याण जगनाथ घोगरे यांच्या पाटील वाड्याची मातीची प्रतिकृती कोंडिबा कुंभार यांनी तयार केली. प्रतिकृतीच्या वरील बाजूस मातीचे अश्वारूढ देव ठेवण्यात आले. सायंकाळी प्रतिकृती वाजत-गाजत भीमा नदीच्या तीरावर नेण्यात आली. नदीकाठावर आरती करून त्याचे नदीत विसर्जन करण्यात आले. तर परिसरातील नरसिंहपूर, गणेशवाडी, सराटी, गिरवी, ओझरे, पिंपरी बुद्रुक गावातही नागपंचमी सण व मंगळागौर उत्सव साजरा करण्यात आली.
चौकट - पावसाळा सुरू होऊन जवळपास चार महिने संपत आले आहेत. तरीसुद्धा पावसाने दांडी मारल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. पण आज सायंकाळी मंगळागौर विसर्जनावेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले. तर महिलांनी ज्यादाचा पाऊस पडून शेत शिवारे फुलु दे असे साकडे मंगळागौरीला घातले.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील वर्धमान बोडके यांच्या मंगळागौरीचे विसर्जनास घेवून जाताना.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा