Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

"आम आदमी पार्टी "चे मुंबई प्रदेश, उपाध्यक्ष- महेमूद देशमुख यांच्या नेतृत्वात वांद्रे पूर्व विधानसभेतील विविध प्रश्नाबाबत बैठक संपन्न


 

संपादक -----हुसेन मुलाणी

टाइम्स -45 -न्युज मराठी

मो.--9730 867 448

                             आम आदमी पार्टी - मुंबई चे उपाध्यक्ष - मेहमुद देशमुख यांच्या नेतृत्वात दि. 24 आॕगस्ट 2023 रोजी वांद्रे पूर्व विधानसभेतील विभिन्न प्रश्नांबाबत एच/ पूर्व विभाग महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांना दिनांक - 24 जुलै 2023 रोजी दिलेल्या निवेदना बाबत त्यांच्या सोबत बैठक झाली.

बैठकीत अनेक विषयांवर समाधानकारक व सविस्तर चर्चा करण्यात आली.

महत्वपूर्ण विषय --

1) रस्ते काँक्रेटीकरण करण्या पुर्वी रस्त्या खालील पाण्या ची लाईन व इलेक्ट्रिक केबल यांचे नियोजन करण्यात यावे!


2) वांद्रे पूर्व विधानसभा परिसरातील रस्त्यावरील खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी दुरुस्त करण्यात यावे !


3) खार रेल्वे स्थानका समोरील जवाहर नगर हिंदी मनपा शाळा जी विकासका द्वारे तोडण्यात आली आहे त्या शाळेची पुनर्बांधणी करणे

विषय -


वॉर्ड 92

1) भारत नगर येथील सरा इमारतीला येणारे दूषित व अपुरे पाणी !


2) संत ज्ञानेश्वर नगर येथील दूषित पाणी 


वॉर्ड 93

1) खेरवाडी पोलीस स्टेशन व अडाणी ट्रान्सफॉर्मर* समोरील मागील 2 वर्षां पासून बंद असलेले शौचालय त्वरित सामान्य नागरिकां करिता त्वरित सुरु करणे.


वॉर्ड 94

1) खार रेल्वे स्थानका समोरील जवाहर नगर हिंदी मनपा शाळा जी विकासका द्वारे तोडण्यात आली आहे त्या शाळेची पुनर्बांधणी करणे


2) उपाध्याय वाडी येथील दुमजली शौचालय दुरुस्त करून त्वरित सामान्य नागरिका करिता सुरु करणे 


2) गोळीबार मिलनसार सोसायटी येथील संपूर्ण मोडकऴीस आलेले सार्वजनिक शौचालय दुरुस्त करून त्वरित सुरु करणे .


वॉर्ड 95

1) खार स्टेशन जवळ मनपा चौकी च्या बाजूला शौचालय अथवा मुतारी बांधणे


2) तीन बंगला नाका येथील नागोरी लगतच्या 6"इंच पाण्याची लाईन दुरुस्त करावी किंवा प्रेशर वाढवून 3 बंगला येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा.


3) बाळ गंगाधर खेर मनपा मॅटर्निटी हॉस्पिटल* मधील अनेक समस्यांबद्दल चर्चा केली.


3) निर्मल नगर साईबाबा मंदिर जवऴ मोठा खड्डा दुरुस्त करणेबाबत 


4) खेरवाडी गोविंदा टावर समोरील कचरा कुंडी ची समस्या मार्गी लावावी.


वॉर्ड 96

1) अनंत काणेकर मार्ग पोलीस चौकी ,नॅशनल गर्ल्स शाळे लगतचे गटारावरचे पूल बनवून देणे


2) बेहराम नाका बंदे नवाज हॉटेल* समोरील रस्ता दुरुस्त करावा.


3) नवपाडा गेट नं 18 ते नवपाडा कब्रस्तान व स्मशान भूमी पर्यंत आपच्या पाठपुराव्याने मंजूर झालेला रस्ता लवकरात लवकर कामास सुरुवात करावी.


सर्व विषयांबाबत .सहाय्यक आयुक्त यांनी संबंधित विभागातील अधिकारी धोत्रे ( कार्यकारी अभियंता - परीरक्षण विभाग ), अजय पाटील* ( सहाय्यक अभियंता - परीरक्षण विभाग ), सुधीर जाधव ( सहाय्यक अभियंता - पाणी पुरवठा विभाग ) , बडगिरे ( MOH ), अर्नाळकर ( सहाय्यक अभियंता - घनकचरा विभाग ), वळवी ( सहाय्यक अभियंता - रस्ते कामे ) व अन्य विभागांच्या संबनधित अधिकारी यांना बोलावुन चर्चा केली. 

तसेच लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले .

 त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने

मनपा सहाय्यक आयुक्त व मनपा अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.



किरण आचरेकर

अध्यक्ष - वांद्रे पूर्व विधानसभा 

आम आदमी पार्टी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा