संपादक ------हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
"नीम हकीम खतरे जान" "मुन्नाभाई की और नेता की है पहचान -- फिर चाहे चली जाये जनता की जान-- फिर भी जनता को करना है नेता का गुणगान.
याप्रमाणे तुळजापूर तालुक्यात ग्रामीण भागात बहुतांश गावामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून लोकप्रतिनिधी अथवा सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार याबाबत आरोग्य विभागाला तक्रारी करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही कारण याला राजकीय वरदहस्त असल्याचा गंध येत आहे आरोग्य विभागाचे या डॉक्टरांशी अर्थपूर्ण माहिती असल्याचे नागरिकांतून दबक्या आवाजात बोलले जात आहे गोर गरिब व भोळ्या भाबड्या जनतेच्या जीवाशी खेळून राजकीय नेते काय साध्य करत आहेत हे न उलगडणारे कोडे आहे या बोगस डॉक्टरांवर कारवाई होण्याच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते अथवा लोकप्रतिनिधी वारंवार निवेदनाद्वारे तक्रार करत आहेत मात्र तालुका आरोग्य अधिकारी अथवा गट विकास अधिकारी डोळे झाकून झोपेचे सोंग घेत असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे या बोगस डॉक्टरांकडे मेडिकल कौन्सिलचे बोगस प्रमाणपत्र असल्याचे समजते त्यामुळे मूळ सत्य राज्य मेडिकल कौन्सिलचे कसलेही प्रमाणपत्र अथवा सर्टिफिकेट नसून या डॉक्टरांकडून रुग्णांना कमी पैशात उपचार केले जात असून आणि या कमी पैशाच्या भूल थापांना बळी पडून रुग्णही त्यांच्याकडून उपचार घेत आहेत परंतु हा प्रकार म्हणजे रुग्णांच्या जीविताची खेळण्याचा प्रकार आहे तुळजापूर तालुक्यात अणदुर,नळदुर्ग , सावरगाव काटगाव मंगरूळ सलगरा दिवटी जळकोट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्राच्या कार्य कक्षेत हे अनेक बोगस डॉक्टरांनी सुरतगाव काक्रंबा मंगरूळ काठी सावरगाव आधी गावामध्ये आपले दुकान थाटले आहे तुळजापूर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुरत गाव येथे ही बोगस डॉक्टर असल्याचे समजते या डॉक्टरांच्या एजंटाकडून डॉक्टरांचा प्रचार व प्रसार केला जात आहे कि डॉक्टर कमी पैशात उपचार करतात त्यामुळे हमखास इलाज होत आहे या भूलथापांना भोळी जनता बळी पडत असुन हे दलाल म्हणजे यमराजा चा रेडा आहे कि काय असे वाटत आहे "गड्याचा गवंडी "होतो त्याप्रमाणे "कंपाउंडर चा डॉक्टर "झाल्याचे आव आणून ग्रामीण भागात व रुग्णांची लूट होत आहे त्यामुळे या बोगस डॉक्टरांना अभय देऊन लोकप्रतिनिधींना काय साध्य करायचे आहे हे न उघडणारे कोडे असून जर या बोगस डॉक्टरांना राजकीय नेत्यांचे गुप्त सहकार्य असेल तर एक ना एक दिवस हे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी लोकप्रतिनिधीला जनता माफ करणार नाही आणि अशा या साखळीत विणले गेलेले डॉक्टरांवर कारवाई करण्याची धमक आरोग्य अधिकारी प्रशासन अथवा राजकीय नेते करतील काय ?असे जनतेतून बोलले जात आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा