संपादक ------हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
दिलीप कुमार साळवे फाउंडेशन यशवंतनगर अकलूज व ग्रामपंचायत चौंडेश्वरवाडी उदयनगर यांच्या संयुक्त विद्यमाने व नॕब नेत्र रुग्णालय मिरज यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी उदयनगर येथील "शंकरराव मोहिते पाटील सभागृह" मध्ये आयोजन केले असल्याची माहिती रमेश दादा साळवे यांनी दिली आहे
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकलूज येथील नामवंत हृदयरोग तज्ञ डॉ. एम के इनामदार व प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीप रतन गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत
या शिबिराची ठळक वैशिष्ट्ये;-- नेत्रोपचार व नेञशस्त्रक्रिया नॕब नेत्र रुग्णालय मिरज येथील नामवंत नेञ तज्ञामार्फत केली जाईल , मोतीबिंदू साठी नेत्र भिंगारोपण, शस्त्रक्रिया , बिन टाका शस्त्रक्रिया , काचबिंदू, लासरू ,डोळ्याचे प्लास्टिक सर्जरी व तिरळेपणा यांचे योग्य निदान व उपचार , निरोपाप्रसंगी गॉगल्स मोफत दिले जातील.
विशेष सुविधा ;--- शिबिराच्या दिवशीच मोतीबिंदू रुग्णांना नॕब नेत्र रुग्णालय मिरज येथे नेहण्यात येईल , रुग्णांना जाण्या येण्याची व्यवस्था केली जाईल , रुग्णांना चहा व जेवणाची व्यवस्था केली जाईल, रुग्णाच्या सोबत येणाऱ्या व्यक्तीस चहा व जेवणाची अल्प खर्चात कॅन्टींग ची सोय, सर्व प्रकारच्या नेञ शसौञक्रिया अत्याधुनिक पद्धतीने दुर्बिनद्वारे नॕब नेत्र रुग्णालय मिरज येथे होईल तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे तसेच चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायत उदयनगर , विझोरी ग्रामपंचायत, विजयवाडी ग्रामपंचायत, यांच्या संयोजकामध्ये शिबिर संपन्न होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा