Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

प्रेषित "हजरत मोहम्मद पैगंबर" यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या जलसावर प्रतिबंध हवा

.        

                 विशेष प्रतिनिधी-- सांगली

                     इक्बाल --मुल्ला

                   मो.--8983 587 160

                        प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी सांगितलेला 'मुस्लिम समाजातील "आसान निकाह"अवघड" करून एका स्थळाचे, एका वर्षात 1600 रुपये "हडपणाऱ्या" "विवाह वधुवर परिचय मेळावा" जलसा चे "पेव" कोल्हापूर - सांगली सह संपूर्ण "महाराष्ट्रात" पिकले आहे. आता या "जलसा" च्या प्रवृत्तीला चाप बसायलाच हवा .

स्थळ जमवणे हे पुण्याचे कार्य आहे .परंतु या निर्लज्ज लोकांनी याचा " व्यवसाय बनवला आहे. 2000 - 5000 रुपयांची "फी " घेऊन गरजवंत आई -वडिलांचा "भ्रमनिरास" करणाऱ्या ,आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या , मानसिक त्रास देणाऱ्या "तरुण -तरुणींच्या" मनाशी खेळणाऱ्या , "संवेदना" हरपलेल्या या " लुटारू" लोकांपासून मुस्लिम समाजाने सावध राहिले पाहिजे

ज्याप्रमाणे "कसाईखान्यात" बकऱ्याला "जुबाह " केले जाते ,त्याप्रमाणे स्थळ शोधणारे आई -वडील आणि त्यांची "मुले" म्हणजे एजंट आणि" मॅरेज ब्युरो" वाल्यांच्या बोलीभाषेत "बकरा " असे संबोधले जाते. "जलसा किंवा मॅरेज ब्युरो" मध्ये नावं नोंदवलेल्या तरुण -तरुणींचे मोबाईल नंबर म्हणजे ही त्यांच्या दृष्टीकोनातून कथित "पैसे छापण्याची" मशीन असते .कारण जलस्यांमध्ये "पालकांचा" मोबाईल नंबर मिळाला की एका पाठोपाठ अनेक एजंट त्या "गरजवंत" पालकांना फोन करून पैशाची मागणी करतात . विवाह जमेल या "आशेपोटी" पालक पैसे देतात .परंतु कधी त्यांच्या खिशातून 5 -25 हजार रु. या एजंटांनी कधी काढून घेतले हे त्यांनाही कळत नाही. शिवाय मानसिक त्रास" वेगळाच .! 

पालकांची ही गैरसोय पाहून इक्बाल मुल्ला यांनी मुस्लिम रिश्ते मोफत या व्हाट्सअप ग्रुप ची निर्मिती केली आहे . ज्यामध्ये केवळ तरुण - तरुणी यांचा समावेश असतो. एजंट /मॅरेजब्युरो यांना ग्रुप मध्ये "प्रवेश" नसतो . माझ्या "मोफत विवाह व्हाट्स ग्रुप" मध्ये पैशासाठी "दलाली" करणारे एजंट ऍड होते. जे दलाल सामील झाले होते त्यांना इक्बाल मुल्ला यांनु शोधून - शोधून रिमोव्ह केले आहे

गरजवंत पालकांनी -तरुण -तरुणींनी माझ्या 8983587160 या व्हॉट्सअप मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. वाचकांनी,आपल्या सभोवताली विवाहयोग्य तरुण -तरुणी असतील तर त्यांच्या पालकांना- ओळखीच्या व"मित्रांना" माझा मोबाईल नंबर द्यावा ! 

" एक नया रुपया" न देता , मोफत स्थळ जमणे हे पवित्र कार्य आहे . 'मोफत लग्न" होणे आणि जमणे हे प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि अल्लाह ला देखील "पसंत" आहे .शिवाय याचे पुण्य ही भरभरून आहे .परंतु लग्नाचे "एजंट" आणि मॅरेज ब्युरो वाल्यानी याचा "धंदा" बनविला आहे . असो ,एजंट व मॅरेजब्यूरो व्यतिरिक्त सर्वासाठी माझा व्हाट्सग्रुप "खुला" आहे

इच्छुक तरुणी -तरुण यांनी माझ्याशी संपर्क साधावा ! इन्शाल्लाह " 3 महिन्यात आपल्याला "अनुरूप" स्थळ मिळेल व आपला विवाह निश्चित होईल याची मला "खात्री" आहे .


इकबाल मुल्ला ( पत्रकार ) संपादक - सांगली वेध , 

संपादक -वेध मीडिया न्यूज ,सांगली .

मोबाईल - 8983587160
            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा