संपादक---- हुसेन मुलाणी टाइम्स 45 न्यूज मराठी मो - 97 30 867 448
वसुंधरा महोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यासाठी संयोजिनी ओमप्रकाश राजे निंबाळकर, अस्मिताताई सचिन ओंबासे,शुभांगी कैलास घाडगे पाटील, शामलताई वडणे, वैशाली मकरंद राजे निंबाळकर, . मनिषाताई शिवाजी राखुंडे पाटील , .पूर्वा अक्षय ढोबळे तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, उस्मानाबाद येथील प्रा.डॉ.सविता गिरबीडे, प्रा.डॉ.शितल मिरजकर आदि मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमामध्ये स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था उस्मानाबाद या संस्थेचे ही उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसुंधरा महोत्सवाचे आयोजक तथा युवासेना युवती सेना उपजिल्हाप्रमुख आणि स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था उस्मानाबाद यांचे अध्यक्ष ॲड. भाग्यश्री शिवाजी रणखांब यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. द्वारका किसन देवळे यांनी केले आणि कार्यक्रमाचे समारोप पर भाषण शिवसेना (उस्मानाबाद) महिला आघाडी तथा जिल्हाप्रमुख सौ. शामलताई वडणे यांनी केले.
युवासेना युवती शिवसेना (उस्मानाबाद) आणि स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांना यांच्या संयुक्त विद्यमाने वसुंधरा महोत्सव अधिक मास /श्रावणी महोत्सव 2023 वर्ष 2रे आयोजित करण्यात आले. दि. 14,15,16 ऑगस्ट 2023 वार सोमवार, मंगळवार, बुधवार समर्थ मंगल कार्यालय पवनराजे काॅम्प्लेक्स उस्मानाबाद या खरेदी विक्री महोत्सवामध्ये विविध वस्तूंचे तसेच राखी आणि खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व खरेदी विक्री महोत्सव आयोजित केला आहे तसेच या सोबतच काही सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले जसे की, मुली व महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांच्या वतीने तसेच लहान मुलांसाठी देशभक्ती वर गीत गायन स्पर्धा आणि दि. 16/08/2023 रोजी दुपारी 2 वाजता महिलांनसाठी विविध खेळाचे आयोजन जसे की, संगीत खुर्ची, तळ्यात-मळ्यात, प्रश्न मंजुषा, लकी ड्राॅ चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 16/08/2023 च्या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि महोत्सवाचा आनंद घ्यावा असे ही आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा