Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी - उदयसिंह पाटील

 


इंदापूर तालुका----प्रतिनिधी

     एस बी तांबोळी

मोबाईल 8378081147

                        समाजकारण राजकारणात शेवट पर्यतच्या घटकांचा विचार करून विकासाची गंगा पोहचवण्याचे काम हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. संस्कारक्षम व अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी काढले.

   शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावरती हर्षवर्धन पाटील यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, केक कापणे आदी कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून उदयसिंह पाटील बोलत होते.

     उदयसिंह पाटील पुढे म्हणाले, राज्यातील एक संस्कारक्षम व अभ्यासू नेतृत्व असून, त्यांचे व्यक्तिमत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असेच आहे. राज्यात काम करीत असताना हर्षवर्धन पाटील यांनी आपले प्रभावशाली नेतृत्व सिद्ध केले आहे. हर्षवर्धन पाटील यांचे व्यक्तीमत्वात दूरदृष्टी असून त्यांच्याकडे जनतेच्या, शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार असतो. राज्यातील सहकार क्षेत्रातील ते ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत. आगामी काळ हा त्यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठा वाढविणारा व अतिशय प्रगतीचा असणार आहे. नीरा भीमा कारखाना चालू गळीत हंगामापासून पूर्वीचे गतवैभव प्राप्त करेल असेही उदयसिंह पाटील यांनी सांगितले.

    याप्रसंगी बोलताना कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी सांगितले की, हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्व विकासाभिमुख आहे. इंदापूर तालुक्याला हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्व लाभले हे आपले सर्वांचे भाग्य आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निरा भिमा कारखान्याचा अडचणीचा काळ संपला असल्याचे त्यांनी सांगितले.

       यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, राजवर्धन पाटील, अँड.कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, जबीन जमादार, कार्यकारी संचालक हेमंत माने तसेच माणिकराव खाडे, संतोष जगताप, के. एस. खाडे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले. सुत्रसंचलन कालीदास आवाड यांनी तर आभार सुधीर गेंगे-पाटील यांनी मानले. 

फोटो - शहाजीनगर येथे नीरा भीमा कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा