अकलूज --प्रतिनिधी
एहसान. मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
शेळगाव ता इंदापूर येथे शिक्षण प्रसारक मंडळ. अकलूज महात्मा फुले कृषी विद्यापिठ अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलुज येथील कृषिमित्रांकडून (दि १७) ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विदयालयाच्या वतीने शेळगाव येथे कृषी कार्यानुभव कार्यक्रम पुढील सहा महीन्यांसाठी राबविण्यात येत आहे.
यावेळी शेळगाव गावचे सरपंच उर्मिला लक्ष्मण शिंगाडे, समता परिषद चे अध्यक्ष राहूल जाधव, भैरवनाथ विकास सोसायटीचे चेअरमन साहेबराव शिंगाडे-पाटील, कर्मयोगी . स. सा. कारखाण्याचे संचालक आबासाहेब शिंगाडे, छत्रपती.स.सा कारखान्याचे संचालक विठ्ठल शिंगाडे, धनंजय ननवरे, तात्यासाहेब शिंगाडे , अशोक शिंगाडे, प्रज्वल (भैय्या) शिंगाडे पत्रकार सचिन तरंगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . यवेळी रत्नाई कृषी महाविदयालयाचे कृषिदूत आदित्य जाधव, संदेश पोळ, प्रथमेश पाटील, रोहन मगर, आशुतोष टेकळे, शुभम पवार, आर्यमन भिलारे, श्रेयश भोसले (साहेब), विशाल गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहीते-पाटील, प्राचार्य.आर. जी. नलावडे, प्रा. एस, एम. एकतपुरे (समन्वयक) प्रा. एम. एम चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा