संपादक -+टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
--अकलूज नगर परिषद साठी २ डिसेंबर रोजी मतदान संपन्न झाले आणि उद्या २१ डिसेंबर रोजी मतमोजणी असून मतमोजणी होणार असून निवडणूक प्रशासनाने जय्यत तयारी झाली आहे तसेच पोलीस प्रशासनाची सुद्धा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर १६० एस आर पी जवान, स्थानिक पोलीस तसेच होमगार्ड आदि अकलूजच्या चौका चौकात तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले शिवाय मतमोजणी असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल वर ही बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून माहिती मिळाली मात्र मतदान झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून नागरिकांमध्ये एक स्वंय घोषित अफवेच्या भितीचेसावट निर्माण झाले आहे कि मतमोजणीच्या दिवशी काहीतरी अनुचित प्रकार घडेल? अशी भिती नागरिकांची असून हे भीतीचे सावट निर्माण झाले यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या मात्र अकलूज मध्ये मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर भीतीचे सावट कधीही निर्माण झाले नव्हते मात्र आता ते निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे ते कोणामुळे निर्माण झाले हा मूळ संशोधनाचा प्रश्न आहे त्यामुळे उद्या रविवार दिनांक २ डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी दैनंदिन व्यवहार चालू ठेवावे की बंद ठेवावे अशी संभ्रमावस्था व्यापारी आणि नागरिका मध्ये आहे
ॲडवटाईज👇
तशी चर्चाही ऐकावयास मिळत आहे मात्र यामुळे हातावर पोट भरणाऱ्या लहान लहान व्यवसायांच्या व्यवसायावर परिणाम होणार हे मात्र नक्की, कारण भीतीपोटी ते आपले व्यवसाय बंद ठेवणार असल्याचे चित्र दिसत असून त्यांच्या एक दिवसाच्या व्यवसायातून मिळणाऱ्या रोजी रोटीला मुकावे लागणार ? राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या उत्तर प्रतिउत्तरामुळे नागरिकांचा तर्क वितर्काला उधान येत आहे की मतमोजणीच्या दिवशी काहीतरी घडणार त्यामुळे नागरिकांना दिलासादेण्यासाठी पोलीस प्रशासनाने शांततेचे आवाहन करुन दिलासा देऊन भीतीची सावट दूर करणे गरजेचे आहे. जेणेकरून दैनंदिन व्यवहार सुरळीत राहतील हीच अपेक्षा...





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा