संपादक------हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.- 9730 867 448
पश्चिम महाराष्ट्रातील माळशिरस तालुक्याला ऊस पिकाचे आगार मानले जाते त्या अनुषंगाने अलीकडच्या काळात माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात केळीचे पीक घेत असून ते केळीचे पीक खरेदी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून सांगली ,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच पुणे जिल्ह्यातून केळीचे व्यापारी मोठ्या प्रमाणात केळी खरेदीसाठी येत असतात
श्रीपुर ते नेवरे हा 9 किलोमीटर चे अंतर असून त्यामध्ये एकूण 5 किलोमीटर रस्ता खराब आहे त्यापैकी नेवरे ते 15 सेक्शन पर्यंतचा हा 2 किलोमीटरचा रस्ता तसेच 14 सेक्शन ते आगाशे नगर, श्रीपुर ,पर्यंतचा 3 किलोमीटर रस्ता एकदम खराब झाला असून 'रस्त्यात खड्डे आहेत- की खड्ड्याचा रस्ता आहे' हेच दिसून येत नाही
त्यामुळे वाहनचालकांना केळीचा लोड भरून वाहन चालवताना तारेवरची कसरत केल्याप्रमाणे वाहन चालवावे लागते शिवाय या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने केळीची लोड भरून जाणारे वाहन पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा रस्ता भयंकर खराब झाला वाहनांचे नुकसान होत असून असून साईड पट्टीवरील झाडांची फाटे रस्त्यावर आल्याने दुचाकी चालकांना नजरचुकीने त्या फाट्यांचा फटका बसुन इजा होत आहेत
बऱ्याच वर्षापासून हा रस्ता आहे त्या अवस्थेत खराब असून अद्याप या रस्त्याची दुरुस्ती ही झाली नाही किंवा खडीकरण अथवा डांबरीकरण ही झाले नाही त्यामुळे या भागातील मतदार नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत नागरिकांमध्ये याविषयी चर्चा केली असता ते म्हणाले की आमदाराला मतदान करून आम्ही मोठी चूक केली आहे त्यामुळे आगामी येणाऱ्या विधानसभेला आमच्या भागाचा विकास करणाऱ्या आमदारालाच आम्ही निवडून देणार अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ आणि मग मतदारातून येत आहेत
मध्यंतरीच्या काळात या रस्त्याला मंजुरी मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते मात्र अद्याप त्याचे काय झाले हे कळण्यास मार्ग नाही आणि अद्याप कामाला सुरुवात ही झाली नाही त्यामुळे श्रीपुर ते नेवरे रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याचा हिशोब चुकता करतील अशी संतप्त प्रतिक्रिया येत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा