संपादक ------हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य व जिव्हाळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मा.श्री.सतिशकुमार रामराव बुरगुटे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक,पत्रकारिता,शेतकरी,उत्कृष्ट महसूल कर्मचारी, जि.प.कर्मचारी, साहित्यिक,वैद्यकीय, खेळाडू,माजी सैनिक,वीर जवान इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवरांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाैरव करण्यात आला.
त्याप्रसंगी ग्रामीण कवी,लेखक,व्याख्याते,सुत्रसंचालक इंद्रजीत पाटील यांच्या साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते यथाेचित सन्मान करण्यात आला.
शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.याप्रसंगी साहित्यिक इंद्रजीत पाटील यांनी आपले मनाेगत व्यक्त केले.त्याबरोबर रसिक श्रोत्यांच्या आग्रहाखातर बहारदार कवितांचे सादरीकरण केले.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्यांनीच केले.
हा कार्यक्रम उपळे (दु.),ता.बार्शी,जि.साेलापूर येथील आेम मंगल कार्यालयात अगदी थाटामाटात पार पडला.महाराष्ट्रातून आलेल्या मान्यवरांनी व प्रमुख वक्त्यांनी या प्रतिष्ठानच्या कार्याचा गुणगाैरव केला व पुढील कार्यासाठी हार्दीक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा