संपादक -------हुसेन मुलानी
टाइम्स -45-न्युज मराठी
मो.--9730 867 448
ताहेरा फाउंडेशन कडून वजू साठी पाण्याची टाकी बांधून देण्याचे अश्वासनाची पूर्तता.
अकलूज येथील - मरहूम हाजी अब्दुल कादरभाई तांबोळी यांनी पंढरपूरच्या मदरशाला वजूखाना बांधुन तयार करून देण्याचे अश्वासन मठवस्ती कासेगाव पंढरपूर येथील समाज बांधवांना दिला होता, माञ मागील दोन वर्षापूर्वी त्यांचे निधन झाल्याने हाजी अब्दुल कादरभाई तांबोळी यांच्या आश्वासनाची पूर्तता त्यांचे चिरंजीव व ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबूबकरभाई तांबोळी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. १५ ऑगस्ट भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मदरसा मदरसतुल मदिना, मठबस्ती- कासेगाव, पंढरपूर या ठिकाणी वजू खाण्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पवित्र कुराणशरीफ चे पठण करण्यात आले. त्यानंतर सारे जहाँ से अच्छा या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबूबकरभाई तांबोळी यांनी ताहेरा फाउंडेशनने राबवलेल्या गेल्या तीन वर्षातील विविध समाज उपयोगी उपक्रमाची माहिती उपस्थितांना करून दिली. त्यावेळी मदरश्याचे नाजीम हाफीज जमशेद रजवी यांनी मठबस्ती पंढरपूर या मदरशाविषयी सर्वांना माहिती सांगितली.व ताहेरा फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमांमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वतंत्रसेनानी यांच्या विषयी कृतज्ञता आपल्या मनोगतातून पंढरपूरच्या मदिना मशिदीचे हाफिज गुलाम सरवर यांनी व्यक्त केली . पंढरपूरच्या दारूलउलूम सुफियाचे कारी साहब शब्बीर आलम यांनी फातेहाखानी करून वजू खाण्याचा प्रारंभ केला.
कार्यक्रमासाठी हाफिज कुतुबुद्दीन साहब, हाफिज अबू सालेह, हाफिज गुलाम दस्तगीर, हाफिज आलम खान रजवी त्याचे बरोबर महाराष्ट्र कुंकू कारखानदार मोहम्मद शरीफ तांबोळी,गुलमोहंमद ग्लास ट्रेडर्सचे हाजी निसारभाई,पंढरपूर मदरसा अध्यक्ष युसूफभाई तांबोळी,हाजी रजाकभाई तांबोळी ,सरकारी वकील ॲड. महामुद पठाण,हाजी सलीमभाई तांबोळी, ॲड.बिलाल कडगे, बशीरभाई तांबोळी,कासेगावचे सरपंच सादिक भालदार,निहाल तांबोळी, डॉ.अमीर भालदार, सांगोला नगरसेवक तोहित मुल्ला,सी.ए .जुबेर मुजावर, प्रा. लवटे सर, इनामदार सर, अब्दुल रहमानभाई तांबोळी, अयाज मनेरी,शहाबाज तांबोळी हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी असलमभाई तांबोळी,आयुबभाई तांबोळी सईदभाई सय्यद , जावेद भालदार, मुसाभाई तांबोळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबिदभाई बेळगावकर यांनी केले तर आभार मंजूर भाई तांबोळी यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा