लक्ष्मीकांत कुरुडकर.
अकलूज(प्रतिनिधी)।
मो.7020665407
निमगाव ता.माळशिरस येथील हिंदू सेना ग्रुप, शिवशंभु युवा प्रतिष्ठाण, व बळीराजा ग्रुप च्या वतीने शनिवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी
खंडोबा मंदीर पाठीमागे, पवार तालीम शेजारील पटांगणात भव्य पारितोषिके असणाऱ्या हिंदू सेना वावडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात प्रथम क्रमांकास चांदीची गदा देण्यात येणार आहे.तरी हौशी लोकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ही स्पर्धा दोन मोठ्या व छोट्या गटात घेण्यात येणार आहे.१२ फूट व त्यापुढील उंचीच्या वावडीच्या मोठ्या गटातील प्रथम क्रमांकास हिंदू सेना केसरी हा मानाचा किताब दिला जाणार आहे.तर त्यापुढे ७ हजार ९००,५ हजार १००,३ हजार १०० व २ हजार ९०० असे अनुक्रमे पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.
४ ते १२ फुट उंचीच्या वावडी स्पर्धेत प्रथम क्रमाक ५ हजार १०० व त्यापुढे ३हजार ९००,२ हजार १००, १ हजार १०० व १ हजार १ रुपये व सन्मान चिन्ह अशी पारितोषिके ठेवली आहेत.
परीक्षक म्हणून श्रीनिवास इनामदार , डी.बी. जाधव, सचिन मगर व काका मगर हे काम पाहणार आहेत.
स्पर्धेसाठी वावडयांची नोंद करणे आवश्यक आहे.वावडी तीन वेळा तुटल्यास स्पर्धेतून बाद केली जाईल. वावडीचे मोजमाप घेण्यासाठी शिंगाची उंची धरली जाणार नाही. वावडीवरील संदेश, बांधनी, संघाची वर्तनूक, व वावडी कशी उडते या सर्व गोष्टी पाहूनच नंबर दिला जाईल. वावडीच्या शेपटीला ब्लेड अथवा कोणतीही धारदार वस्तु वापरता येणार नाही. आयोजकांनी आखून दिलेल्या भागामध्येच वावडया उडवाव्या लागणार आहेत .
महोत्सवादिवशीच दु. १२ ते २ या वेळेत वावड्यांची नोंद करण्यात येईल.असे आयोजक पै.दत्ता मगर यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा