इंदापूर तालुका----प्रतिनिधी
एस बी तांबोळी
मोबाईल 8378081147
आगामी काळात भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेसाठी राजकीय वाटचाल मोठ्या यशाची व भरभराटीची राहणार आहे. राज्यातील अनुभवी नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्व संघर्षातून निर्माण झालेले आहे. त्यामुळे हे नेतृत्व प्रत्येक संकटावरती यशस्वी होताना दिसत आहे, असे गौरवोद्गार नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी बावडा येथे सोमवारी (दि.21) काढले.
श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने श्री शिवाजी शैक्षणिक संकुल मध्ये हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस केक कापून तसेच रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, बाल विद्यार्थ्यांसाठी खेळाचे रु. 5 लाख रक्कमेचे साहित्य प्रदान, ग्रंथालय प्रदर्शन, ओपन जिम उदघाटन, रांगोळी स्पर्धा उदघाटन, विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, दोरी रस्सीखेच स्पर्धा आदी उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना लालासाहेब पवार पुढे म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांनी राज्यात काम करीत असताना सुसंस्कृत व अभ्यासू व्यक्तीमत्वाच्या जोरावर इंदापूर तालुक्याचा नावलौकिक महाराष्ट्रभर वाढविला आहे. इंदापूर तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.
याप्रसंगी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे म्हणाले, राज्यात हर्षवर्धन पाटील यांचे वलय कायम असल्याचा प्रत्यय वेळोवेळी येत आहे. त्यांनी 20 वर्षात 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात असताना केलेल्या कामामुळे आज इंदापूर तालुक्याचा झालेला विकास दिसून येत आहे.
आगामी सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना भाजपचे आमदार म्हणून निवडून आणणेसाठी, प्रत्येक कार्यकर्त्यांने नियोजन करणे ही हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्तची सर्वात मोठी सदिच्छा ठरेल, असे मत यावेळी विलासराव वाघमोडे यांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील तसेच अमरजीत कांबळे, जानवी गुरव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव किरण पाटील, खजिनदार उमेश सूर्यवंशी, प्रसाद पाटील, स्वप्निल घोगरे, संजय घोगरे, संतोष सूर्यवंशी, विठ्ठल घोगरे या संचालकांनी मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, अशोक घोगरे, मयूरसिंह पाटील, हरिदास घोगरे, विकास पाटील, डॉ. लक्ष्मण आसबे, सुधीर पाटील, मिलिंद पाटील, अजय पाटील, हरिभाऊ बागल, नामदेव घोगरे आदीसह गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिरामध्ये 61 बाटल्या रक्ताचे संकलन इंदापूरच्या मुक्ताई रक्तपेढीचे सहकार्याने करण्यात आले. सूत्रसंचालन एस. टी. मुलाणी तर आभार प्राचार्य डी. आर. घोगरे यांनी मानले.
फोटो:- बावडा येथील शिवाजी शैक्षणिक संकुल मध्ये हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. (फोटो-सुरज बोरगावकर, बावडा )
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा