Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

औद्योगिक करवाढीच्या माहितीकरता प्रभारी विधानसभा अध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत यांचे लाक्षणिक उपोषण

 


संपादक हुसेन मुलानी

टाइम्स 45 न्युज मराठी

 मो.9730 867 448

                         तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी हे गाव मराठवाड्याचे प्रवेशद्वार असून याच ठिकाणी मिनी औद्योगिक वसाहत आहे या वसाहतीत लहान मोठ्या कंपन्या मिळून ३० ते ३५ कंपन्या असून ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी मधून याच संपूर्ण कंपन्याची कारवाढी बद्दलची माहिती उपलब्ध नसल्यामुळे ती माहिती देण्यासाठी ज्या माहितीआधारे पुढील कारवाढ करून जवळपास एक ते सव्वा कोटी कर आकारणी करून संकलन केली जाऊ शकते भविष्यात या निधीचा वापर गावात सिमेंट रस्ते,पाणीपुरवठा सुव्यवस्थेत करणे, आरोग्य उपकरणे उपलब्ध करणे, शाळेतील विद्यार्थ्याकरिता डिजिटल शाळा बनवण्याकरता साहित्य खरेदी करणे, कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन तसेच इतर ज्या मूलभूत सुविधाचा अभाव असेल त्यांची पूर्तता करून सर्वसामान्य जनतेकरीता सर्वसोई उपलब्ध करून देण्याकरिता कोणत्याही आमदार अथवा खासदाराच्या निधीची वाट बघण्याची आवश्यकता नसेल तसेच यापूर्वी शासकीय नियमाप्रमाणे कंपन्यांना करवाढ करण्यात आली नसल्यामुळे त्याबाबतची अभिलेखे उपलब्ध करण्यासाठी आज दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रभारी अध्यक्ष सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) यांनी लाक्षणिक उपोषण केले उपोषण सुरू होण्यापूर्वी त्यांनी मौजे तामलवाडी येथील त्यांचे मित्र गणेश चेंडके सर यांच्या मातोश्री सखुबाई दत्तात्रय चेंडके यांचे काल रात्री अचानक अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना करून दोन मिनिट मौन पाळून घोडकेसर यांच्या कुटुबीयांना या दुःखातून सावरण्याची ताकद त्यांच्या कुटुंबीयांना मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना केली त्यानंतर उपोषणाद्वारांन शासकीय प्रतिनिधी म्हणून विस्तार अधिकारी (पं) श्री ए. सी. कावळे, ग्रामसेवक श्री चैतन्य गोरे, सरपंच नूरबानू सिकंदर बेगडे यांच्या मध्यस्तीने लेखी आश्वासनानंतर आवश्यक असलेले अभिलेखेपैकी जे सध्या उपलब्ध असलेले अभिलेख श्री सावंत यांना हस्तांतरित करण्यात आले असून उर्वरित अभिलेखे ०८ दिवसात उपलब्ध करणार असल्याचे आश्वासन लेखी स्वरूपात देऊन व करवाढीकरता आवश्यक ती प्रशासकीय बाब म्हणून ग्रामपंचायत मौजे तामलवाडी अंतर्गत दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेली आहे त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात श्री सावंत यांनी आंदोलन स्थगित केले आहे त्याप्रसंगी रा.काँ चे ग्रा.पं. सदस्य सतीश माळी, हनुमंत गवळी व सिकंदर बेगडे, पंडागळे, बाळू भोसले बाळू भोसले, यांनी या आंदोलनास उपस्थिती दर्शवून पाठिंबा जाहीर केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा