अकलूज प्रतिनिधी
लक्ष्मीकांत कुरुडकर
टाइम्स 45 न्युज मराठी
पत्रकारिता क्षेत्रात दैदिप्यमान तसा उमटवणाऱ्या दैनिक नवराष्ट्र च्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यावर्षीचा महिला वुमन्स अवॉर्ड 2023 चे आयोजन केले असून यानिमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय विशेष कामगिरी करणाऱ्या कर्तबगार महिलांची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार क्षेत्रात आणि आता राजकीय क्षेत्रात 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणाऱ्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी असंघटित कामगार आघाडीच्या अध्यक्षा ज्योतीताई कुंभार यांना "नवराष्ट्र पुरस्कार "जाहीर झाला असून दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी गणेश आॕडोटेरियम न्यू इंग्लिश स्कूल प्रिमायसेस टिळकरोड सदाशिव पेठ पुणे ४११०३० येथे दुपारी 3 वाजता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर व आमदार सौ अश्विनी जगताप यांच्या उफस्थितीत देण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा