Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

अकलूज येथील पाच रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणाबद्दल 'अकलूज पोलीस स्टेशन' व सदाशिवराव माने विद्यालयाच्या वतीने सन्मान

 


अकलुज------प्रतिनिधी

शकुर------तांबोळी

 मो.-9860 112 351

                           अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागातील उर्मिला शिर्के मॅडम या माळशिरस ते अकलूज हा नेहमीप्रमाणे टमटम ने प्रवास करत असताना आज शाळेला येत असताना त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण गडबडीत गाडीतच पडले. त्या गडबडीत त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांना शाळेजवळ सोडून गाडी भाडे करण्यासाठी निघून गेली. नंतर दोन तासांनी मॕडम यांच्या लक्षात आल्यावर शोधाशोध केली पण गंठण नेमके कुठे विसरले का? पडले हे काही लक्षात येत नव्हते बरीच शोधाशोध केल्या नंतर रिक्षावाले यांना फोन लावला असताना ते गंठण रिक्षावाला तानाजी सोपान बोकपोडे त्यांच्याच रिक्षात सापडले. त्यानी ते गंठण प्रामाणिकपणे शाळेत येऊन मॅडम यांना परत केले. 

आजच्या युगात अशी माणसे सापडणे फारच दुर्मिळ आहे. आज प्रामाणिकपणा कुठेतरी हरवला आहे. असे दिसत असताना बोकपोडे व त्यांच्या रिक्षा संघटनेतील 1) रामभाऊ चव्हाण 2) समाधान आवारे 3) बाळू साठे 4) राजेंद्र कावळे 5) सुरेश जाधव यांनी आजपर्यंत 9 मोबाईल व 1 आयफोन व रिक्षात विसरलेले नऊ तोळे दागिने परत केल्याबद्दल अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने या सर्वांचा सत्कार करण्यात आला आहे यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा अकलूज परिसरात होत असून त्याबद्दल बोकपोडे व रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष, सहकारी यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व इतर शिक्षक यांनी अभिनंदन केले. आयष्यात असाच प्रामाणिकपणा विद्यार्थ्यांनी दाखवावा म्हणून त्यांचा विद्यार्थ्यां समोर सत्कार करण्यात आला. त्यांनी समाजापुढे प्रमाणिकपणाचा एक आदर्श ठेवलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा